कदम साहेबाच्या धाडीत, हातभट्टीचे वाहिले पाट ! अवैध दारू विक्रीची लागेलच आता वाट !!
शिरूर अनंतपाळ : ( कैलास साळूंके ) एखादा कर्तबगार अधिकारी आला म्हणजे त्या विभागाची सक्रीयता कशी वाढते याचे उत्तम उदाहरण शिरुर अनंतपाळ तालुक्यातील लोकांना येऊ लागली आहे, शिरुर अनंतपाळ पोलीस स्टेशन चा पदभार स्वीकारल्यानंतर शिरुर अनंतपाळ परिसरात आपल्या कार्याची चुणूक दाखवत अनेक धाडसी कारवाई करून , मटका, गुटखा, अवैध दारू विक्री करणारया धंदेवाल्यांवरती कारवाई केल्या आहेत, दिनांक 1/5/2021 रोजी आपल्या माहितीगारा मार्फत गोपनीय पध्तीने घुग्गी सांघवी परिसरात चालू असलेल्या हातभट्टी ची माहिती घेतली आणि आपले निवडक सहकारी घेऊन अगदी गोपनीय पध्दतीने धाड टाकली कदम साहेबांच्या अपेक्षे प्रमाणे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हातभट्टी चा उधोग चालू होता ,धाड टाकताच अनेक बॅरेल, हातभट्टी दारू बनविण्याचे रसायन एकूण मुद्देमाल 85000 रूपयांचा माल नष्ट केला व विनापास बेकायदेशीररित्या गावठी हातभट्टी बनविणाऱ्या आरोपी 1) अश्वीन फुलचंद राठोड 2) लखन फुलचंद राठोड 3) प्रभु मोहन राठोड 4) सतिष देवराव पवार सर्व रा घुग्गी सांघवी ता. शिरुर अनंतपाळ यांच्यावर कारवाई करून, सदरील तपास पो.हे.काॅ बब्रुवान तपघाले हे करीत आहेत.