1582 रुग्णांनी केली कोरोना वर मात

1582 रुग्णांनी केली कोरोना वर मात

नवीन 1290 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 57023 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 1290 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 29 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 2470 आरटीपीसीआर तपासण्या करण्यात आल्या. त्यामध्ये 638 रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. 26350रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 652 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 72342 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 12432 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1305 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58605 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1582 आहे.

About The Author