सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने पोलीस अधिकारी कर्मचार्यांना सॅनिटायझर वाटप
उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथील सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने उदगीर येथील पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचारी यांच्या आरोग्याचा विचार करून तसेच कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी म्हणून मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. पोलिस प्रशासनातील बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना जनतेच्या सतत संपर्कात यावे लागत असल्यामुळे या अधिकाऱ्यांच्या आरोग्याची काळजी सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीने घेण्याच्या उद्देशाने आम्ही सॅनिटायझर चे वाटप करत असल्याचे विचार सह्याद्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा भाजपचे युवा नेते बाळासाहेब पाटोदे यांनी व्यक्त केले. सॅनिटायझर वाटपाच्या प्रसंगी उदगीर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे, पोलीस उपनिरीक्षक गजानन पाटील, पोलीस उपनिरीक्षक एडके, खेडकर, अंधोरिकर, फडेवाड तसेच पोहेकाॅ संजय दळवे पाटील, बाळासाहेब पाटोदे, अजिंक्य पाटील, अक्षय घोरपडे, कपिल धनशेट्टी, राजकुमार ऊर्फ प्रदीप घोरपडे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.