राम चामे यांची लातूर कॉंग्रेस अपंग सेल च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

राम चामे यांची लातूर कॉंग्रेस अपंग सेल च्या जिल्हाध्यक्षपदी निवड

लातूर (प्रतिनिधी) : लातूर तालुक्यातील पाखरसांगवी येथील कॉंग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते तथा पंचायत समिती सदस्य राम चामे यांची लातूर कॉंग्रेस अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अमित देशमुख, राज्याचे माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आ.धिरज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली लातूर कॉंग्रेसचे जिल्हाअध्यक्ष श्रीशैल्य उटगे यांनी दि. 26 डिसेंबर रोजी लातूर जिल्ह्यात विविध सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणारे कॉंग्रेस कार्यकर्ते यांना पक्षात काम करण्यासाठी कॉंग्रेस पक्षाच्या विविध आघाडी सेल जिल्हाध्यक्षपदाच्या निवडी जाहीर केल्या आहेत. त्याच अनुशंगाने अपंग सेलच्या जिल्हाध्यक्षपदी राम चामे यांची निवड करण्यात आली आहे. निवडी बदल सर्वच स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून निवडीमुळे कॉंग्रेस पक्षाला लातूर जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी मोठा फायदा होणार आहे.

About The Author

error: Content is protected !!