यदू जोशी यांना ‘दर्पण सेवा गौरव’ पुरस्कार जाहीर

यदू जोशी यांना 'दर्पण सेवा गौरव' पुरस्कार जाहीर

तर पत्रकार दिनकर मद्देवार व संतोष अचवले यांना ‘दर्पण जीवन गौरव’ पुरस्कार’…!!!

अहमदपूर (गोविंद काळे) : जेष्ठ पत्रकार यदू जोशी (जेष्ठ पत्रकार,दैनिक लोकमत,मूंबई) यांना साहित्य संगीत कला अकादमीच्या वतीने दिला जाणारा यंदाचा ‘दर्पण सेवा गौरव राज्य पुरस्कार 2019’ जाहीर झाला आहे तर स्थानिक पातळीवर पत्रकार म्हणून कार्यरत असणारे जेष्ठ पत्रकार दिनकर मद्देवार (पत्रकार दै.लोकपत्र अहमदपूर) व संतोष अचवले (पत्रकार दै.सकाळ वडवळ) यांना ‘दर्पण जीवन गौरव पुरस्कार 2020 देवून गौरव करण्यात येणार आहे.

साहित्य संगीत कला अकादमी (महाराष्ट्र)अहमदपूर जि.लातूर च्या वतीने प्रत्येक वर्षी पत्रकारीता क्षेत्रात राज्यस्तरावर उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीस ‘दर्पण सेवा गौरव पुरस्कार दिला जातो.शाॅल-स्मृतीचिन्ह, लेखनी, मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.या पूर्वी जयप्रकाश दगडे(लातूर),राही भिडे मॅडम(मूंबई),राजा माने (सोलापूर), अशोक सूरवसे(मूंबई), अतुल कुलकर्णी (मूंबई),किरण तारे(मूंबई) आदींना हा पुरस्कार देवून गौरवण्यात आले आहे.

तसेच अहमदपूर व चाकूर तालूक्यात पत्रकारिता क्षेत्रात उत्कृष्ट सेवा देणा-या दोन जेष्ठ पत्रकारांची प्रत्येक वर्षी पूरस्कार निवड समितीच्या वतीने निवड करण्यात येते.यंदा जेष्ठ पत्रकार दिनकर मद्देवार (दैनिक लोकपत्र अहमदपूर ) व संतोष अचवले (पत्रकार, दैनिक सकाळ, वडवळ) यांना ‘दर्पण जिवन गौरव पुरस्कार’ देण्यात येणार आहे. शाॅल- स्मृतीचिन्ह- मानपत्र पूष्पहार असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

या पूर्वी हा पुरस्कार जेष्ठ पत्रकार मा.रा. कराड, प्रा.एस.एम.कूलकर्णी, अ.ना.शिंदे, उदयकुमार जोशी, संदीप अंकलकोटे, बाबूराव श्रीमंगले, रवीकांत क्षेत्रपाळे, प्रशांत शेटे, सूरेश डबीर, सूधाकर हेमनर यांना प्रदान करण्यात आला आहे.

हा पूरस्कार आचार्य बाळशात्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ लवकरच अहमदपूर जि.लातूर येथे मान्यवरांच्या हस्ते देण्यात येणार असल्याची माहिती साहित्य संगीत कला अकादमी चे अध्यक्ष युवक नेते डॉ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी, प्रा.मारोती बुद्रुक पाटील, सय्यद याखूब,विलास चापोलीकर, प्रा.अनिल चवळे,गफारखान पठाण, आकाश सांगविकर, जीवनराव गायकवाड, बालाजी कारामूंगेकर, मोहम्मद पठाण, तरबेज सय्यद, प्रा. दिपक बेले, शिवाजी भालेराव, गणेश शिंदे,राजू सूर्यवंशी, दिलीप भालेराव, प्रा.उध्दव श्रंगारे, सागर क्षीरसागर, प्रशांत जाभाडे,ईश्वर कांबळे, बालाजी मस्के, सय्यद नूर, सय्यद नौशाद यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे.

About The Author

You may have missed

error: Content is protected !!