ज्ञानदीप अकॅडमी मध्ये फौजी चा सहपत्निक सत्कार
अहमदपुर (गोविंद काळे) : तालुक्यातील ज्ञानदीप मिल्ट्री पोलीस अकॅडमी चा विद्यार्थी शिवप्रसाद गवळी याने खडतर अशी बेळगाव येथील प्रशिक्षण पूर्ण करून सध्या झाशी येते कार्यरत आहे. सुट्टी वर आला असता आपल्या पत्नी सह अकॅडमी ला भेट दिली त्यावेळी अकँडमीच्या वतिने त्यांचा सपत्निक सत्कार करण्यात आला.
अकँडमीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिवप्रसाद गवळी यांनी सांगितले की, मी आठ महिन्यामध्येच अकॅडमी मधून आर्मी मध्ये भरती झालो माझ्या घरच्यांची परिस्थिती चांगली नव्हती. माझ्या कडे भरती ला जाण्यासाठी पैसे नव्हते पण उध्दव इप्पर सरांनी मला भरतीला जाण्यासाठी पैसे दिले व मी त्याच भरती मध्ये यशस्वी झालो. असे मनोगत व्यक्त करून विद्यार्थ्यांना प्रोत्साहीत केले .
अध्यक्षीय समारोप अकॅडमी चे संचालक उद्धव इप्पर यांनी केले तसेच सुत्रसंचलन प्रा. नितीन गुट्टे व आभार महीला प्रशिक्षक ऋतुजा बनकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जितेंद्र मेजर, शहनाज हुशेन, संदीप नरोटे, प्रकाश राठोड, ओम रेड्डी यांनी केले.