लिंगायत समाजा तर्फे खा.सुधाकर शंगारे यांचा सत्कार

लिंगायत समाजा तर्फे खा.सुधाकर शंगारे यांचा सत्कार

उदगीर( प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे खा. सुधाकर शृंगारे यांनी लातूर रिगंरोड येथील जगज्योती माहत्मा बसवेश्वर यांचा पुतळा इतरत्र स्थलांतरित करू नये म्हणून केंद्रीय मंत्री व भाजपा नेते नितीन गडकरी यांच्याकडे शिष्टमंडळ घेऊन प्रयत्न केल्याबद्दल खा. सुधाकर शृंगारे व उदगीर तालुक्यातील देवर्जन येथील सुपुत्र व भाजपचे उदगीर तालुका अध्यक्ष शिष्टमंडळात सदस्य म्हणून बस्वराज रोडगे व भाजपचे लातूर जिल्हाअध्यक्ष गुरुनाथ आण्णा मगे‌ यांचाही सत्कार करण्यात आला.

यावेळी देवर्जन येथील अखंड शिवनाम सप्ताह कमिटी अध्यक्ष माधव लक्ष्मण रोडगे, शिवलिंग पणतोजी ,सचिन रोडगे, अविनाश भद्रशेट्टी ,सागर रोडगे ,शिवा गरिबे, माजी चेअरमन सूर्यकांत रोडगे, उदय बुरांडे, संग्राम रोडगे, गणेश पाटील ,संतोष रोडगे, मुकुंद बुरांडे, नागनाथ स्वामी व परिसरातील लिंगायत बंधू आणि भगिनी हजारोच्या संख्येने उपस्थित होते. शिष्टमंडळातील माधवराव पाटील टाकळीकर, प्रेरणा होनराव, विश्वनाथ निरुगुडे, केदार रासुरे ,जाधव साहेब, ओमप्रकाश झुरळ, या सर्वांचे लिंगायत समाजाचा वतीने आभार मानण्यात आले.त्याचबरोबर खासदार खासदार सुधाकरराव शृंगारे यांच्या कडे देवर्जन येथील लिंगायअप्पा मठ संस्थेसाठी मागणी करण्यात आली होती.शृंगारे यांनी तत्काळ ३०लक्ष रुपये मंजूर करून लगेच त्या ठिकाणी भूमिपूजन केल्याबद्दल गावकऱ्यांनी आभार मानले आहेत.

About The Author

error: Content is protected !!