श्यामलाल हायस्कूल मध्ये महाराष्ट्र दिन साजरा
उदगीर(प्रतिनिधी) : 01 मे महाराष्ट्र दिन या निमित्ताने श्यामलाल मेमोरियल हायस्कूल मध्ये ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला.
श्यामलाल मेमोरियल हायस्कूल चे मुख्याध्यापक आनंद चोबळे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहन कार्यक्रम संपन्न झाला. संस्था अध्यक्ष ऍड. सुपोषपाणि आर्य, संस्था उपाध्यक्ष गिरीशजी मुंडकर, संस्था सचिव ऍड. विक्रमजी संकाये, सहसचिव श्रीमती अंजुमणिताई आर्य यांनी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचा शुभेच्छा संदेश दिला.
याप्रसंगी व्यासपीठावर संस्था उपाध्यक्ष गिरीश मुंडकर, संस्था सदस्य पी. जी. पाटील ,शालेय समिती सदस्य पंडितराव सुकनिकर, तेजस आंबेसंगे तसेच संस्था सदस्य सुरेश खेडकर, मोहनराव निडवंचे, भागवतराव घोळवे, माजी सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनील बागडे,माजी प्रा. बी. डी. कुलकर्णी, माजी मुख्याध्यापक बालाजी सोनकांबळे, प्रभारी उपमुख्याध्यापक बालाजी चव्हाण प्रभारी पर्यवेक्षक राहूल लिमये, जेष्ठ शिक्षक प्रा. सपाटे ज्ञानेश्वर, प्रा. खंदारे भारत, संजय देबडवार, नारायण कांबळे इत्यादी उपस्थित होते. महाराष्ट्र दिन स्थापनेची व कामगार दिनाची माहिती गीर भगवान आणि मोहनराव निडवंचे यांनी आपल्या भाषणातून दिली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे स्वागत शाळेच्या वतीने करण्यात आले. यासाठी शेख सईद यांनी सहकार्य केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमाकांत सूर्यवंशी यांनी केले तर आभार व्यक्त करण्याचे कार्य संस्कृत विभाग प्रमुख प्रमोद कावरे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीरित्या संपन्न झाला.