कष्टकरी कामगारांच्या श्रमाचे मोल झालेच पाहिजे – आ. संजय बनसोडे
उदगीर(एल.पी.उगीले) : कामगारांच्या समस्या सोडविण्यासाठी मी कायम प्रयत्नशील आहे. शासनाच्या सर्व योजना मतदारसंघातील कामगारांना मिळाव्यात, यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे स्पष्ट करीत मी कामगार पुत्र म्हणून तुमच्या सेवेत कायम सोबत आहे. असे मत माजी गृहमंत्री आ. संजय बनसोडे यांनी व्यक्त केले. ते कामगार मेळाव्याच्या उद्धघाटन प्रसंगी बोलत होते.
महाराष्ट्र शेतकरी व बांधकाम कामगार मजुर संघटनेच्या वतीने ललीत भवन येथे आयोजित कामगार मेळाव्याच्या अध्याक्ष स्थानी कामगार आयुक्त मंगेश झोले हे होते. प्रमुख उपस्थिती मध्ये जितेंद्र शिंदे, व्यंकट बरगे, नागनाथ कावर, विजय भालेराव, सुनिल मादळे, समिर शेख, मुकेश भालेराव, बाबासाहेब सुर्यवंशी अँड. विजयकुमार मुळे, सरपंच उषा यमनाजी भुजबळे, छाया राठोड, भरत कुंडगिर, सुनिता पाटील, लक्ष्मण कुंडगिर, दिलीप भंडे, शिवकर्णा अंधारे, उषा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थित होती. यावेळी बोलतांना आ. बनसोडे म्हणाले, मी कामगाराचा पुत्र असल्यामुळे मला कामगारांच्या समस्या जवळून माहित आहेत. बांधकाम कामगारांसाठी मध्यान्ह भोजन सुरू केले, कामगारांच्या किटचा विषय असेल किंवा घरकुलाचा तो मार्गी लावण्यासाठी सतत अधिकाऱ्यांना सुचना करीत असतो. कामगार भवनाचा प्रश्न लवकरच मार्गी लावला जाईल, असे अश्वासन दिले. यावेळी कामगार आयुक्त मंगेश झोले म्हणाले, राज्य सरकार कामगारांच्या कल्याणासाठी ३२ योजना राबवित असुन यासर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी कामगारांनी कामगार नोंदणी करणे गरजेचे आहे. कामगारांना किट, आरोग्याच्या सुविधा, विमा, घरकुल अशा योजना देत असतो. कामगारांनी आँनलाईन कामगार नोंदणी करुन सर्व योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन ही झोले यांनी केले. कामगार मेळाव्याचे प्रास्ताविक धनराज भोसले यांनी केले. कार्यकमाचे सुत्रसंचालन सचिन शिवशेट्टे यांनी तर आभार नामदेव भोसले यांनी मांडले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिवाजी सोनकांबळे, कमलाकर सांगवीकर, अंगद कांबळे, संजय बोरगावे, शुभम कावर, अक्षय सगट, चंद्रकांत कावर, विवेकानंद खिंडे, बालाजी रनक्षेत्रे, अंगत भाटकुळे, बाळू गुलफुरे, सग्राम गायकवाड, हनुमंत कांबळे आदीसह संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.