पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार अॕड सुजाता माने यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार अॕड सुजाता माने यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते प्रदान

देवणी (प्रतिनिधी) : महिला व बालविकास क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल महिला बालविकास विभागामार्फत देण्यात येणारा अहिल्यादेवी होळकर जिल्हास्तरीय पुरस्कार सामाजिक कार्यकर्त्या सुजाता माने यांना जिल्हा क्रीडा संकुलन लातूर येथे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी. यांच्या शुभ हस्ते शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ स्मृतीचिन्ह आणि पुरस्काराचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल देवदत्त गिरी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी लातूर, गजानन सेलुकर जिल्हा परिविक्षा अधिकारी,गणेश जोंधळे जिल्हा संरक्षण अधिकारी,प्रविण मनाळे विधी सल्लागार, दिपक सगर समुपदेशन,यांच्यासह महिला, पुरुष, युवक, युवती यांच्या कडून अभिनंदन करण्यात आले.या प्रसंगी प्रा, चंद्रकला भार्गव, प्रा, सुचेता वाघमारे, सौ अनुराधा बेळंबे, अनिता माने, सरोज पवार, अंजली विभुते, अनिता शेळके, वरुनराज सुर्यवंशी कवठाळकर, सानिका केंद्रे,साईनाथ केंद्रे यांनीही कौतुक केले.

About The Author