ज्येष्ठ नागरिक हे आपल्या जीवनातील अनमोल शिदोरी – आ.संजय बनसोडे

ज्येष्ठ नागरिक हे आपल्या जीवनातील अनमोल शिदोरी - आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : आयुष्य जगत असताना आपल्या अवतीभवती ज्येष्ठ नागरिक असणे हे गरजेचे असून त्यांची सेवा करण्याचे भाग्य आपणास मिळाले ही सर्वात मोठी गोष्ट आहे. सर्व ज्येष्ठ नागरीक हे परमेश्वराचे रुप असतात. आपल्या संस्कृती प्रमाणे आपण वडीलधा-या मंडळीना देवाप्रमाणे पुजतो, व त्यांच्या आयुष्यातील अनुभवाने आपण आपले भविष्यातील आयुष्य जगत असतो. त्यांच्या अनुभवानेच आपल्या जीवनाची सुरुवात होते. त्यांच्या योग्य मार्गदर्शनाने आपण जीवनात यशस्वी होत असतो, कारण ज्येष्ठ नागरिक हे आपल्या जीवनातील अनमोल शिदोरी आहेत.असे मत आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केले.

ते नगर परिषद उदगीरच्या वतीने उभारण्यात आलेल्या आपुलकी क्षणभर विश्रांती ज्येष्ठ नागरिका करिता विरंगुळा केंद्राच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.या प्रसंगी मुख्याधिकारी शुभम क्यातमवार, ज्येष्ठ नागरिक रमेश अंबरखाने, जयवंत पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेवक अनिल मुदाळे, दत्ता पाटील, बबीता भोसले, सावन पस्तापुरे, गणेश गायकवाड, ज्ञानेश्वर आपटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा.रमाकांत मध्वरे, कचरूलाल सारडा, हकीम , दीपक बलसुरकर,अमित पाटील, रमेश एकंबे, रमेश पोरे, माणिकराव शिंदे, गणपत नखाते, चारुशीला पाटील, आशिष पाटील, राहुल सोनवणे, संघशक्ती बलांडे, नंदकुमार नळगिरकर, बाबासाहेब सूर्यवंशी,माशाळकर, भातंबरे, आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना आ.संजय बनसोडे म्हणाले, गेल्या अनेक दिवसापासून उदगीर शहरातील ज्येष्ठ नागरीकांची मागणी होती की, उदगीर शहरांमध्ये ज्येष्ठ नागरिकांकरिता विरंगुळा केंद्र असावे. त्यांच्या या मागणीचा विचार करून निधी उपलब्ध करून घेऊन नगरपरिषदेच्या वतीने आज क्षणभर विश्रांती ज्येष्ठ नागरिकांकरिता या विरंगुळा केंद्राचे उद्धाटन करण्यात आल्याने मला मनस्वी आनंद झाला आहे. भविष्यात ज्येष्ठ नागरिकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी या विरंगुळा केंद्रामध्ये आणखी काही निधी उपलब्ध करून देवुन ज्येष्ठ नागरिकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या सोयीचे व त्यांना आवडेल असे साहित्य उपलब्ध करणार असल्याची ग्वाही आ. संजय बनसोडे यांनी दिली.

About The Author