किनगाव येथील दुकानांना आग सव्वा कोटीचे नुकसान
किनगाव (गोविंद काळे) : येथील मेन रोडवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोरच्या बाजूस असलेल्या तीन दुकानांना मंगळवारी रात्री अंदाजे साडेआठ वाजेच्या दरम्यान अचानक लागलेल्या आगीत तीन दुकाने जळून खाक झाल्याची घटना घडली या आगीत चार दुकानदारांचे मिळून सव्वा कोटी रुपयाचे नुकसान झाल्याची नोंद किनगाव पोलिसात करण्यात आली आहे.
येथील मेन रोडवर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोरच्या बाजूस पत्राच्या शेडमध्ये फर्निचर दुकान, जनरल, मशिनरी स्टोअर्स चे दुकान आहे.या दुकानास मंगळवारी रात्री साडेआठ दरम्यान अचानक आग लागली ही आग एवढी भडकली होती अग्निशमन दलास पाचारण करण्यात आले,तीन तासांनंतर ही आग आटोक्यात अली पण तोपर्यंत तीन दुकाने जळून खाक झाली तर आगीत बाजूच्या एका कापड दुकानांचे नुकसान झाले.ही आग विदुत प्रवाहाच्या शॉर्ट सर्किट ने लागल्याचे व्यापारी यांनी सांगितले. घटनास्थळी आमदार बाबासाहेब पाटील,सरपंच किशोर मुंडे यांनी भेट दिली.बुधवारी सकाळी मंडळाधिकारी सोपान दहिफळे,तलाठी हंसराज जाधव यांनी जळालेल्या दुकानांचा पंचनामा केला.या आगीत मोठया प्रमाणात नुकसान झाले असल्याचे व्यापारी यांनी तहसीलदार यांना दिलेल्या अर्जात सांगितले आहे,यात नसीर शुकुरसाब मोमीन यांचे सिमरन फर्निचर इंटरप्रायजेस अँड मोबाईल शॉपी यांचे अठ्ठाविस लाख रुपयांचे नुकसान तर हाफिज शुकुरसाब मोमीन यांचे अब्दुल शुकुर मशिनरी स्टोअर्स यांचे अडुसष्ठ लाख रुपयांचे नुकसान तर गियासोद्दीन शुकुरसाब मोमीन यांचे न्यू अब्दुल शुकुर जनरल स्टोअर्स चे विस लाख रुपयांचे नुकसान तसेच शेख शफीक बशीरसाब यांचे न्यू बालाजी क्लाथ सेंटर यांचे दहा लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे तहसीलदार यांना दिलेल्या अर्जात म्हटले आहे. किनगाव पोलिसात याबाबत आकस्मित ची नोंद करण्यात आल.