अहमदपूर नांदेड (जिल्हा सीमेपर्यंत) रस्त्याचे दुहेरीकरनास मंजुरी – गणेश हाके पाटील
नितीन गडकरी यांनी सी आर आय एफ (CRIF)फंडा मधून 20 कोटी रुपये मंजूर केले
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर ते शिंदगी (बु.) (जिल्हा सीमेपर्यंत) 12 किमी पर्यंत रस्त्याचे दुहेरी करण्यासाठी मा. गणेशदादा हाके पाटील यांच्या विनंतीवरून रस्ते भूपृष्ठ वाहतूक, महामार्ग, सुक्ष्म- लघु व मध्यम केंद्रीय औद्योगिक मंत्री मा नितीन गडकरी यांनी 1983.02 लाख रुपयांचा निधी सी आर आय एफ फंडातून मंजूर केला असल्याचे प्रदेश प्रवक्ते गणेशदादा हाके पाटील यांना पत्राने कळविले असल्याचे हाके पाटील यांनी सांगितले. 12 की.मी लांबीच्या या रस्त्याची रुंदी 21 फूट असून हा रस्ता दुहेरी (Two Lane) असणार आहे.
सी आर आय एफ फंडातून मंजूर केलेल्या या रस्त्याचे इस्टीमेंट बिडिंग प्रक्रिया राज्य शासनाचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून केली जाणार आहे. नांदेड जिल्ह्याच्या सीमेपर्यंत च्या या दोन्ही रस्त्यामुळे अहमदपूर तालुक्यातील जनतेची फार मोठी सोय होणार आहे. त्याबद्दल गणेशदादा हाके पाटील,अशोक केंद्रे जी.प.सदस्य, त्र्यंबक गुट्टे मा.जी प सदस्य, ता.अध्यक्ष हणमंत देवक्तते, प्रताप पाटील, दत्ता जमालपुरे, परमेश्वर पाटील, व्यंकट मुंडे, अमोल तरडे,शरद मुंडे,आरिफ सय्यद,माधव मुंढे , रमेश कांबळे आदी भाजप कार्यकर्त्यांनी मा. नितीन गडकरी यांचे आभार मानले आहेत.