1225 रुग्णांनी कोरोना वर केली मात
नवीन 889 कोरोनाबाधित रुग्ण
लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 66240 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 889 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 32 रुग्णांचा मृत्यु झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.
लातूर जिल्ह्यात 1562 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 779 अहवाल प्रलंबित आहेत. 226 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. कालच्या प्रलंबित मधील 272 पॉझिटिव्ह आले आहेत. 1908 रॅपीड अॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 391 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 78972 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11233 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1499 रुग्णांचा मृत्यु झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 66240 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1225 आहे.