शिरूर अनंतपाळ पोलीसांची दमदार कामगिरी, लाखो रूपयांची दारू केली जप्त
शिरुर अनंतपाळ ( किशोर सुरशेट्टे ) : शिरुर अनंतपाळ परिसरात काही हौशी कलाकार विनापरवाना मोठ्या प्रमाणात अवैध देशी दारूची तसेच विदेशी दारूची अवैद्य विक्री करून मालामाल होण्याची स्वप्न पाहत आहे. काही प्रमाणात यशस्वी झाले असतील देखील! मात्र शिरुर अनंतपाळ पोलिसांनी अशा पद्धतीच्या अवैद्य दारू विक्री करणाऱ्या तरुणांना रंगेहात पकडून मुद्देमालासह जप्त करण्याचा सपाटा चालवला आहे. लॉक डाऊन च्या काळात बार आणि परमिट रूम तसेच दारूची दुकाने बंद होती.
त्यानंतर दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात आली. तसेच अवैध दारू चढ्या भावाने विक्री करून मोठी उलाढाल या परिसरात चालू होती . मात्र लॉकडावूनच्या काळात मधल्या मार्गाने ग्रामीण भागात विनापरवाना पद्धतीने काही बऱ्याच बियर बार आणि देशी दारूवाले अवैध दारू विक्री करत असल्याची माहिती शिरुर अनंतपाळ पोलीसांना मिळाली होती,
दि.०८.०५.२०२१ मा. श्री. निखीलकुमार पिंगळे पोलीस अधिक्षक लातुर व श्री. विद्यानंद काळे उपविभागीय पोलीस अधिकारी चाकुर यांचे मार्गदर्शनाखाली दि.०७.०५.२०२१ रोजी कोव्हिड-१९ च्या निबंधाची अमलबजवणी न करता अवैध रित्या दारु ची विक्री करण्याकरीता आपल्या कब्जात देशी दारु घेऊन जात असताना त्यांचेवर कायदेशीर कार्यवाही करण्यात आलेली आहे. याबाबत सविस्तर माहीती खालील प्रमाणे.
उजेड परीसरात अवैध दारुविक्री करणाऱ्या १२ लोकाविरुध्द गुन्हे दाखल करून त्यांचेकडुन २२ पेटया (प्रत्येक पेटीमध्ये ४८ बाटल्या अशा एकूण १,०५६ बाटल्या) ज्याची किंमत एकुण ४८१८०/- रुपये व यामध्ये दोन चारचाकी व दोन मोटार सायकलीवर वाहतुक करीत असताना मिळुन आल्याने त्या वाहने गुन्हयामध्ये जप्त करण्यात आले आहे. ज्याची किमत ३४००००/- असे एकुण ३८८१८०/- रुपयेचा मुद्देमाल जप्त करुन संबधीत एकुण 12 आरोपी वर खालील प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला
१) गु.र.न. १०८/२०२१ कलम ६५ (अ) (ई),८१,८३ म.प्रो. का. व कलम १८८,२६९, २७० भा.द.वि. २) गु.र.न. १०९/२०२१ कलम ६५ (अ) (ई), ८१,८३ म.प्रो.का.व कलम १८८.२६९, २७० भा.द.वि.
३) गु.र.न. ११५/२०२१ कलम ६५ (अ) (ई), ८१,८३ म.प्रो.का. व कलम १८८, २६९,२७० भा.द.वि.
४) गु.र.न. ११६/२०२१ कलम ६५ (अ) (ई).८१,८३ म.प्रो. का. व कलम १८८, २६९, २७० भा.द.वि. गुन्हे दाखल करण्यात आले असुन गुन्हयाचा तपास पो. हे का. ३२२ एम.एन. कच्छवे करीत आहे.
सदरची कामगीरी हे मा. श्री. निखील पिगळे पोलीस अधिक्षक लातुर, श्री. हिमंत जाधव अपर पोलीस अधिक्षक लातुर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री. विद्यानंद काळे उपविभागीय पोलीस अधिकारी चाकुर, श्री. परमेश्वर कदम पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन शिरुर अनंतपाळ व पोलीस अमलदार पो.हे.का.३२२ एम.एन. कच्छवे, पो.हे. का. ५५८ लक्षमण पाटील, पो.ना. १३७६ लतीफ सौदागर, पो. ना. १३४१ मनोज मोरे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.