ईदच्या पार्श्वभूमीवर लाॅकडाऊन मध्ये सुट द्यावी – सांगवे
उदगीर (प्रतिनिधी) : कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी म्हणुन सध्या लाॅकडाऊनचे कडक निर्बंध लागु करण्यात आले आहे.असे असले तरी सध्या रमजान महीना चालू असून 14 रोजी रमजान ईद आहे.मुस्लिम समाजासाठी हा सण मोठासण असुन या सणासाठी बाजारातून आवश्यक साहित्य खरेदी करण्यासाठी प्रशासनाने दिनांक 11मे ते 13 मे च्या दरम्यान किराणा दुकान व दूध डेअरी चालू ठेवण्याची परवानगी द्यावी.तसेच लाॅकडावूनच्या कडक निर्बंधात सुट द्यावी अशी आग्रही मागणी राष्ट्रिय दलित अधिकार मंचचे प्रदेश अध्यक्ष तथा नगर परिषदेचे माजी नियोजन सभापती,नगर सेवक निवृती सांगवे (सोनकांबळे )यांनी केले आहे.
जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,कोव्हीड 18च्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने नव्याने पूरवणी आदेश काढून दिनांक 13 पर्यंत विकेंन्ड सारखे कडक लाॅकडावून लागू केले आहे.दरम्यान आता मूस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महीना संपत असून दिनांक 14 रोजी ईद आहे.नवीन आदेशामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
या ईदच्या संबंधाने दिनांक 11ते13 मे च्या दरम्यान कोव्हीड 19 च्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून ठराविक वेळेत किराणा दुकान तसेच दूध डेअरी चालू ठेवल्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे.
रमजान हा सण हिंदु मुस्लिम स्नेह निर्माण करणारा आहे.ज्या पध्दतीने दिवाळीच्या सणामध्ये हिंदु बांधव मुस्लिम समाजातील बांधवांना सहभागी करून घेतात.त्याच पध्दतीने या ईदच्या प्रसंगी मुस्लिम बांधव हिंदु बांधवांना आपल्या आनंदात सहभागी करतात.सध्या कोरोना संसर्गाची भिती असल्याने प्रशासनाचे आदेश पाळत मुस्लिम बांधव घरच्या घरी मोठा उत्सव न करता आनंदाने सण साजरा करतील.मात्र या सणासाठी आवश्यख साहित्य खरेदीसाठी दोन दिवस लाॅकडाऊन मध्ये सुट द्यावी अशी मागणी निवृती सांगवे यांनी केलीआहे. हातावर पोट असलेल्या मुस्लिम बांधवांना या सणाचा आनंद घेता यावा. या साठी ही सुट गरजेची असल्याचेही निवृती सांगवे यांनी विनंती केली आहे.