मराठा आरक्षण रद्य हा निर्णय दुर्दैवी – अनिल जाधव

मराठा आरक्षण रद्य हा निर्णय दुर्दैवी - अनिल जाधव

पुणे (रफिक शेख) : राज्यातील मराठा आरक्षणाबाबत मे.सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल दुर्दैवी आणि मराठा समाजातील गरीब विद्यार्थ्यावर अन्याय करणार ठरेल, त्यासाठी या निकालावर राज्य सरकारने फेरविचार याचिका दाखल करावी अथवा त्यावर कशा पद्धतीने पर्याय काढता येईल याचा विचार करून भूमिका घ्यावी अशी मागणी शिव संग्राम पक्षाचे लातूर जिल्हाध्यक्ष प्रा.अनिल जाधव पाटील यांनी केली आहे.त्यांच्या या मागणीला मराठा क्रांती मोर्चातर्फे पाठिंबा देण्यात आला आहे.मराठा आरक्षणासाठी आ.विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली लाॅकडाऊन संपल्यानंतर व्यापक स्वरूपाची बैठक घेऊन लढा द्यायचा असल्याचेही प्रा. अनिल जाधव पाटील यांनी सांगीतले.

आज पर्यंत राजकीय नेत्यांचे आरोप प्रत्यारोपात मराठा समाजाचे मोठे नुकसान झालले आहे.राजकारणी लोक त्यांच्या पक्ष हिताचा विचार करूनवागत आहेत.मराठा समाजाचा विचार घेऊन लढा ऊभारणारे नेते विनायक मेटे यांच्या नेतृ त्वात पुन्हा लढा ऊभारून आपली मागणी मान्य करून घेऊ असेही मत  यावेळी प्रा.अनिल जाधव पाटील यांनी व्यक्त केले आहे. मे. सर्वोच्च न्यायालयाच्या ५ सदस्यीय खंडपीठाने एस.ई.बी.सी. प्रवर्गाच्या कायद्याला तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा पाया असलेला राज्य मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील महत्वाच्या शिफारशींना असहमती दर्शवत मराठा आरक्षण नामंजूर केलं आहे. मराठा समाजाची बाजू सरकारतर्फे सक्षमपणे मांडली गेली नाही. असाही आरौप प्रा.अनिल जाधव यांनी केला आहे. मे. सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे मराठा समाजाचे नुकसान झाले आहे. त्यासाठी आता केंद्राला कायद्यात  दुरुस्ती करावी लागेल किंवा मे.न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी लागेल. असे देखील यावेळी सांगण्यात आलं. या निर्णयाने मराठा समाजात मोठ्या प्रमाणावर असंतोष पसरलेला आहे. मे.सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचा जनमानसात आणि एकूणच आरक्षण धोरणावर नेमके काय काय ? परिणाम होणार आहे हे आगामी काळात बघावे लागेल. त्याच्या प्रतिक्रिया राज्यात ठिकठिकाणी सुरु होणार्‍या आंदोलनातून दिसून येतील,शांततेच्या मार्गाने कायदा आणि सुव्यस्थेचे भान आणि जान ठेवून आज पर्यंत मराठा समाजाने लढा दिलेला आहे.शांततेच्या मार्गाने न्याय मागीतला आहे.असेही प्रा.अनिल जाधव पाटील यांनी सांगीतले.

About The Author