अन्नसुरक्षा दिनाच्या निमित्त उपजिल्हाधिकारी व तहसीलदार यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप
अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील धसवाडी येथे राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिन हा अहमदपुर तालुक्याचे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी आणि पुरवठा विभागाचे नायब तहसीलदार डी के मोरे यांच्या हस्ते लाभार्थ्यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना अंतर्गत मोफत धान्याचे वाटप करून राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिन केला साजरा.
याविषयी सविस्तर माहीती अशी की, अहमदपूर तालुक्यातील धसवाडी येथे स्वस्त धान्य दुकानदार विकास देशमुख यांनी राष्ट्रीय अन्नसुरक्षा दिनाचे औचित्य साधून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता महाराष्ट्रामध्ये कोरोनाची रुग्ण संख्या वाढत चालली असल्याने सध्या परिस्थितीत महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊन चालू असल्याने राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी लाभार्थ्यांना मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य देण्याचे मंजूर केले आहे त्या अनुषंगाने धसवाडी येथे उपजिल्हाधिकारी प्रमोद कुदळे व तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीमध्ये पाच कार्डधारकांना मोफत धान्य देण्यात आले.
उपजिल्हाधिकारी पुढे बोलताना असे म्हणाले की, महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत चालल्याने जनता उपाशी राहणार नाही म्हणून राज्य सरकार व केंद्र सरकार यांनी लाभार्थ्यांना पाच किलो प्रमाणे ३ किलो गहू व २ किलो तांदूळ मे आणि जून या दोन महिन्याचे मोफत धान्य देण्याचे ठरवले आहे. तरी सर्व लाभार्थ्यांनी आपापल्या गावातील स्वस्त धान्य दुकानात जाऊन आपले धान्य घेऊन जाण्यास सूचना केल्या आहेत.
धान्य वाटप लाभार्थी जाधव गंगाधर , हेमनर गंगाधर, पौळ विमलबाई, चंदेवाड शेषराव, क्षीरसागर विकास, या पाच लाभार्थ्यांना उपजिल्हाधिकारी व तहसीलदार अहमदपूर यांच्या हस्ते मोफत धान्य वाटप करण्यात आले.
यावेळी स्वस्त धान्य दुकानदार विकास देशमुख, तलाठी भरतराव मुंडे, सरपंच प्रेमचंद दुर्गे ,शिवानंद चावरे अविनाश देशमुख, मुरलीधर देशमुख, चंद्रकांत देशमुख, रणजीत क्षीरसागर, ज्ञानोबा चंदेवाड, गंगाधर हेमनर, क्षिरसागर गुरुजी व गावातील नागरीक उपस्थित होते.