ईदच्या पार्श्वभूमीवर 11ते 13 मे रोजी किराणा व दूध डेअरी चालू ठेवण्यास परवानगी द्या..!
सम्राट मित्रमंडळाची मागणी
अहमदपूर (गोविंद काळे) : सध्या रमजान महीना चालू असून 14 रोजी रमजान ईद येत असून दिनांक 11मे ते 13 मे च्या दरम्यान किराणा दुकान व दूध डेअरी चालू ठेवण्याची परवानगी द्यावी अशी आग्रही मागणी सम्राट मित्र मंडळाच्या वतीने युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी निवेदनाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी लातूर यांना दिलेल्या निवेदनात पूढे म्हटले आहे की,कोव्हीड 18च्या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रशासनाने नव्याने पूरवणी आदेश काढून दिनांक 13 पर्यंत विकेंन्ड सारखे कडक लाॅकडावून लागू केले आहे.दरम्यान आता मूस्लीम बांधवांचा पवित्र रमजान महीना संपत असून दिनांक 14 रोजी ईद होवू घातली आहे.नवीन आदेशामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागणार आहे.
या ईदच्या संबंधाने दिनांक 11ते13 मे च्या दरम्यान कोव्हीड 19 च्या सर्व नियम व अटींच्या अधीन राहून ठराविक वेळेत किराणा दुकान तसेच दूध डेअरी चालू ठेवल्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. या निवेदनावर गफारखान पठाण,अजय भालेराव,मोहम्मद पठाण,शेख नूर,शहारूख पठाण,सय्यद नौशाद,आकाश भालेराव,शरद बनसोडे,दिलीप भालेराव आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत. या निवेदनाच्या प्रती जिल्हा पोलीस प्रमुख,लातूर, उपजिल्हाधिकारी अहमदपूर,तहसिलदार अहमदपूर,मुख्याधिकारी न.प.अहमदपूर यांना दिलेल्या आहेत.