पोलीस फ्लॅश न्यूजचा दणका !! तक्रारदारास डॉक्टरने लुबाडलेले पैसे परत करण्याचा नोडल अधिकाऱ्याचा आदेश !!!
लातूर (प्रतिनिधी) : साप्ताहिक “पोलीस फ्लॅश न्यूज” सडेतोड आणि निर्भीड लिखाणासाठी ओळखले जाते. पत्रकारितेचे आदर्श मानदंड जपत आम्ही गेल्या आठ वर्षापासून काम करत आहोत. हे काम करत असताना “भ्रष्ट प्रवृत्तीला लाथ आणि सज्जनांना साथ” हे धोरण ठेवूनच आम्ही काम केले आहे. सत्याला साथ देत असताना अनेक अडथळे येणे, अनेकजण नाराज होणे! हे ओघानेच येते.
दिनांक 6 मे 2021 रोजी “कोरोनाची वाढत चालली महामारी! सर्वसामान्यांना लुबाडणारे टोळी लयभारी” या मथळ्याखाली विधिज्ञ रतन विरभद्र कव्हाळे यांच्या तक्रार अर्जाच्या प्रमाणे लातूर येथील वेंकटेश हॉस्पिटल अँड क्रिटिकल केअर सेंटर यांनी तक्रार दाराकडून अवाजवी बिल आकारल्या संदर्भात आणि त्या अनुषंगाने योग्य न्याय मिळावा. अशा पद्धतीचा जिल्हाधिकारी यांना दिलेला अर्ज विचारात घेऊन आम्ही सडेतोड लिखाण केले होते. सदरील लिखाणाची दखल घेत संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भामध्ये तज्ञांकडून मार्गदर्शन मागवून व्यंकटेश हॉस्पिटल अँड क्रिटीकल केयर सेंटर यांनी रुग्णाला दिलेल्या बिलाचे ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. अधिकृत अधिकाऱ्याने ऑडिट केल्यानंतर अव्वाच्या सव्वा आकारण्यात आलेले बिल कमी करून शासनाने ठरवून दिलेल्या बिलाच्या आकाराने पैसे घेण्याचे आदेशित करण्यात आले आहेत! नोडल अधिकारी काकडे यांनी अशा पद्धतीचा आदेश डॉक्टर शीतल पाटील व्यंकटेश हॉस्पिटल आणि क्रिटिकल केअर सेंटर यांना 7 मे 2021 रोजी दिला असून सदरील पत्राची एक प्रत जिल्हाधिकारी लातूर आणि अर्जदार रतन कव्हाळे यांना दिली आहे. समाज माध्यमावर आम्ही लिखाण केल्यानंतर या डॉक्टरांची पाठराखण करणाऱ्या आणि स्वतःला तज्ञ समजणाऱ्या अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया नोंदवल्या!
आमचे पत्रकार मित्र “बातमी मागच्या बातमीचे संपादक जावेद शेख,” यांनी परवाच “राक्षसी प्रवृत्तीच्या मंडळींना देवदूत पदवी देण्याचा लातुरात पडतोय घातक ट्रेण्ड! लातूरला दिशा देतोय की दशा करतोय आत्मचिंतनाची गरज” या मथळ्याखाली अत्यंत मार्मिक आणि सडेतोड लिखाण केले आहे. चुकीच्या पध्दतीने चुकीच्या डॉक्टरांची पाठराखण करणाऱ्या तथाकथित विद्वान मंडळीचे धिंडवडे काढले आहेत!
या ठिकाणी जी प्रतिक्रिया नोंदवली त्यातला थोडासा भाग आमच्या वाचकांसाठी देणे आम्ही गरजेचे समजतो,
“मी डॉक्टर शीतल पाटील यांच्यासोबत आहे” अशा मथळ्याखाली दिलेला मसुदा असा ‘ या कोरोणाच्या मारामारी मध्ये प्रत्येक जण कोणाला ना कोणाला नाव ठेवत आहे .ज्याला जसा अनुभव आला तसा तसेच सध्या एक वकील त्याच्या वकिलीचा गैरफायदा घेऊन व्यंकटेश हॉस्पिटल डॉक्टर शीतल पाटील यांच्याकडून पैसे उकळण्यासाठी ब्लॅकमेल करून खंडणी मागण्याचा प्रकार दिसत आहे. या गोष्टीची कठोर शब्दात निंदा करतो या पूर्ण घटनेचा मी साक्षीदार आहे. जर मी तेथे नसतो तर मला डॉक्टर चुकीचे आहेत असे वाटले असतं, तक्रारदाराच्या आई खूप सिरीयस असून मरणाच्या वाटेवर होती. तिला डॉक्टरांनी ऍडमिट करून घेतले, जेव्हा की कोणीच ॲडमिट करून घेत नव्हते. त्यानंतर तिला लागणारे इंजेक्शन शासकीय दराप्रमाणे उपलब्ध करून दिले. अकरा दिवस तिचा उपचार करून एक जीव वाचवला….. वगैरे वगैरे तसेच यामध्ये स्वतःची फुशारकी मिरवताना तक्रारदाराला मूर्ख ठरवत आपण 1 लाख 40 हजार रुपये चार दिवसासाठी बिल भरण्याचा कांगावा ही केला आहे. तसेच तक्रारदारावर खालच्या थरातून टीकाही केलेली आहे. वास्तविक पाहता सत्य परिस्थितीचे ज्ञान नसताना नको त्या ठिकाणी ज्ञान पाजळायला निघालेली मंडळी अशाच पद्धतीच्या आपल्या अज्ञानाचे धिंडवडे काढून घेत असतात! असो अशा प्रवृत्ती बद्दल आम्हाला काही म्हणायचे नाही.
आम्ही स्पष्टपणे लिहिले, संबंधित अधिकाऱ्यांनी बिल तपासणी केली आणि अतिरिक्त आकारण्यात आलेले पैसे तक्रारदाराला देण्यासाठी आदेशित केले. हे सर्वात महत्त्वाचे आहे! असे आम्ही समजतो, सत्य लिहीत असताना अनेकांचा रोषही पत्करावा लागतो, नाराजीही पत्करावी लागते. वेळप्रसंगी टीका सहन करावी लागते हे आम्ही जाणतो.
आपसातील हेव्यादाव्यासाठी चुकीच्या प्रवृतीला कोणी साथ देणे कितीपत योग्य?हे ज्याचे त्याने ठरवावे!आम्हाला एवढेच वाटते कोणीही वादीसाठी हाल्या कापण्यात पुरूषार्थ समजू नये!जे चुक आहे,त्याला चुक म्हणण्याची हिंमत ठेवावी !