साईबाबा शुगर लि. साखर कारखान्याकडे ११ शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत २१ लाख रूपये त्वरीत मिळवुन द्या

साईबाबा शुगर लि. साखर कारखान्याकडे ११ शेतकऱ्यांचे ऊसाचे थकीत २१ लाख रूपये त्वरीत मिळवुन द्या

सिंदगी(बु) येथील शेतकऱ्यांची तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील सिंदगी(बु) येथील ११ शेतकऱ्यांनी साईबाबा शुगर लि. साखर कारखाना शिवणी (बोंदी)ता औसा येथे गळीप हंगाम इ.स २०२० रोजी गाळपास घातलेल्या उसाचे २१ लाख रू अद्याप थकीत असल्यामुळे ते मिळवुन देण्यासाठी तहसीलदार यांना निवेदन दिले आहे.

  याविषयी सविस्तर माहीती अशी की,तालुक्यातील सिंदगी(बु ) येथील ११ शेतकऱ्यांनी ऊस गळीत हंगाम इ.स २०२० साली साईबाबा शुगर लि. साखर कारखाना शिवणी (बोंदी ) ता ओसा जि लातुर येथे आपल्या शेतातील ऊस गाळपासाठी दिला होता सदरील ऊसाची रक्कम पंधरा दिवसात संबंधीत शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर पाठवून देऊ असे आश्वासन कारखाण्याने सर्व शेतकऱ्यांना दिले होते परंतु पंधरा दिवसानंतर सुद्धा कारखान्याकडून रक्कम मिळत नसल्याचे पाहुन शेतकऱ्यांनी कारखान्यावर जाऊन चौकशी केली असता ११ शेतकऱ्यांना २१ लाख रूपये रक्कमेचे कारखाण्याच्या सही निशी प्रत्येक शेतकऱ्यांच्या ऊसाच्या रक्कमेचा उल्लेख करून धनादेश देण्यात आले शेतकऱ्यांनी सदरील धनादेश वटवण्यासाठी बँकेत जमा केले असता ते सर्व धनादेश कारखाण्याच्या बँक खात्यात रक्कम शिल्लक नसल्यामुळे परत आले असता शेतकऱ्यांनी परत त्या विषयी कारखान्याकडे विचारणा केल्यानंतर बरेच दिवस वारंवार पंधरा ते विस दिवसात रक्कम देऊ असे खोटे आश्वासन देण्यात आले.
त्यातच शासनाच्या लॉकडाऊन व निर्सगाच्या लहरीपणा मुळे आम्ही शेतकरी अडचणीत आहोत , आम्हा काही शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न समारंभ सुध्दा पैश्या अभावी मोडण्याच्या मार्गावर आहेत व येणारी पेरणी कश्याच्या जिवावर करावी हा सुध्दा चिंतेचा विषय झाला आहे आम्हा शेतकऱ्यांना पैसे मिळवुन न्याय द्यावा असे निवेदन तहसीलदार प्रसाद कुलकर्णी यांना सामाजिक कार्यकर्ते शंकर मुळे यांनी दिले आहे.

सदरील निवेदनावर शेतकरी सहदेव थावरे, दशरथ थावरे, तुळशीराम थावरे, माधव थावरे, मालु थावरे, बळीराम थावरे, तुकाराम मुळे, ज्ञानोबा मुळे, विनायक मुळे, अमोल मुळे, व्यंकट मुळे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

About The Author