डॉ.नरसिंह भिकाणे यांना “कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान”पुरस्कार प्रदान
अहमदपूर ( गोविंद काळे ) : कोविड महामारी काळामध्ये सर्व लोक घरात असतानाही मनसे जिल्हाध्यक्ष डॉ भिकाणे हे रोज कोविड रुग्णांना भेटून बेड,रेमडेसीवर,आर्थिक मदत हे करत असतानाच गेली वर्षभर विविध जनसमस्यांविरोधात जसे रस्ते,पाणी,वीज,पीकविमा यासाठी रोज आंदोलन करत रस्त्यावर आहेत व न्याय मिळवून देत आहेत.का योध्याप्रमाणे स्वतःच्या जीवाची पर्वा न करता सातत्याने एक समाजदूत म्हणून त्यांनी वैद्यकीय असो वा सामाजिक वा राजकीय वा साहित्यिक(कविता) असो सतत विविध प्रश्नांवर आवाज बुलंद केला आहे व जनतेला न्याय मिळवून देत मदत केली आहे. याचीच नोंद घेत विश्वात्मक मराठी साहित्य परिषद व अखील महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखक संघ ज्याचे मार्गदर्शक पदमश्री डॉ विजय कुमार शाह आहेत यांच्या संयुक्त विद्यमाने मनसे जिल्हाध्यक्ष डॉ नरसिंह भिकाणे यांना राज्यस्तरीय “कोविड योद्धा समाजरक्षक महासन्मान 2021″हा पुरस्कार ऑनलाइन पद्धतीने प्रदान केला गेला.या बद्दल त्यांच्यावर सोषल मीडिया सहित जनतेतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.या पुरस्काराबद्दल त्यांचे वडील प्रा.उद्धवराव भिकाणे, आई सौ प्रेमकला भिकाणे यांनी समाधान व्यक्त केले आहे.