तपसे चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक

तपसे चिंचोली येथे कृषी विभागाच्या वतीने सोयाबीन बियाणे उगवण प्रात्यक्षिक

औसा (प्रशांत नेटके) : शेतकरी बांधवांनी सोयाबीन पेरण्याचे ठरविले असेल त्यांनी आपल्याकडे घरीच किंवा गावातील उपलब्ध असलेल्या सोयाबीन बियाणाची उगवण चाचणी घेऊन त्यानुसारच बियाणे पेरणीसाठी वापरावे, शेतकऱ्यांनी आपला उत्पादन खर्च कसा कमी करता येईल याचा विचार करून खरीप 2021 पेरणीचे नियोजन करावे, माती तपासणी याबाबत मार्गदर्शन कृषी विभाग औसा यांच्या कडून तपसे चिंचोली येथे करण्यात आले.

सोयाबीन सरळ वाण व स्वपरागीत पीक असल्याने बियाणे दरवर्षी बदलण्याची आवश्यकता नाही ,मात्र पेरणीपूर्वी उगवण चाचणी घेणे आवश्यक आहे. यासाठी सोयाबीनच्या प्रत्येक पोत्यातून प्रातिनिधिक नमुना काढून त्यातील काडीकचरा काढून टाकून नमुना एकत्र करावा. गोनपाट स्वच्छ धुऊन घ्यावे त्यातील एक ओला तुकडा जमिनीवर पसरावा व काढलेल्या प्रातिनिधिक नमून्यातून सरसकट 100 दाणे दिड ते दोन सेमी च्या अंतरावर 10- 10 च्या रांगेत गोनपाटाच्या एका तुकड्यावर ओळीत ठेवावेत. त्यावर गोनपाटाचा दुसरा तुकडा अंथरूण यावर चांगले पाणी शिंपडावे व गोणपाटाची बियाणासकट गुंडाळी करून हळुवारपणे सावलीच्या ठिकाणी ठेवून द्यावी. अशाप्रकारे अधून मधून त्याला पाणी शिंपडून ती गुंडाळी ओली ठेवावी. पाच ते सहा दिवसानंतर गुंडाळे उघडून चांगले कोंब आलेले दाणे वेगळे करून मोजून घ्यावे. सरासरी काढून 100 दाण्यांपैकी 70 किंवा जास्त दाणे उगवून आले असतील तर आपले बियाणे पेरणीस योग्य आहे असे समजावे व एकरी 30 किलो या प्रमाणात बियाणे वापरावे जर उगवणशक्ती 70 टक्केपेक्षा कमी आले तर प्रत्येक एक टक्का मागे अर्धा किलो बियाणे जास्तीचे वापरावी. अश्या प्रकारे घरच्या घरी सोयाबीन उगवण क्षमता अंदाज येतो. हि चाचणी पेरणीच्या एक-दोन आठवडे अगोदर करावी. अश्या प्रकारे प्रात्यक्षिक दाखवून सखोल मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कृषी अधिकारी एम. जी. वाघमारे, कृषी अधिकारी कंदले ए. पी. शेतकरी मारुती नेटके, बालाजी शिंद, प्रवीण नेटके, दिलीप लादे, खंडू नेटके, दत्ता स्वामी, प्रशांत नेटके माधव कांबळे ,सदानंद नेटके, उपस्थित होते.

About The Author

You may have missed

बसस्थानकातील गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणाऱ्या महिलेकडून आणखी तीन तोळे सोने जप्त, पाच गुन्हे उघड.‎‎ लातूर (एल पी उगिले) जिल्ह्यातील विविध बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी करणाऱ्या टोळीवर स्थानिक गुन्हे शाखा, लातूर यांनी प्रभावी कारवाई करत एका महिला आरोपीस अटक करून तिच्याकडून चोरीस गेलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. या कारवाईमुळे औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर येथील बसस्थानक परिसरात घडलेल्या चोरीच्या अनेक घटना उघडकीस आल्या आहेत.‎लातूर जिल्ह्यातील मालमत्तेविषयक गुन्ह्यांवर प्रभावी नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री. अमोल तांबे यांनी कडक निर्देश दिले आहेत. त्या अनुषंगाने अपर पोलीस अधीक्षक श्री. मंगेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वातील पथक सातत्याने गस्त व माहिती संकलन करून गुन्हे उघडकीस आणण्याचे काम करत आहे.‎ सदर पथकाने दिनांक 5 मार्च रोजी पुनम जितू कांबळे (वय ३४ वर्षे, रा. गांधीनगर, उदगीर, जि. लातूर) हिला ताब्यात घेऊन तिच्याकडून एक सोन्याचे मणी मंगळसूत्र व एक सोन्याची साखळी असा अंदाजे १३ ग्रॅम ३९० मिली वजनाचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला होता. पुढील तपासासाठी तिला पोलीस ठाणे औसा यांच्या ताब्यात देण्यात आले होते.‎ तपासादरम्यान आरोपी पुनम कांबळे हिने तिची साथीदार अनिता विशाल कांबळे (रा. गांधीनगर, उदगीर) हिच्यासह मागील चार ते पाच महिन्यांपासून औसा, शिरूर ताजबंद व अहमदपूर बसस्थानक परिसरात बसमध्ये चढणाऱ्या प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेत महिलांच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरी केल्याची कबुली दिली. ‎त्यावरून नमूद महिला आरोपी पुनम जितू कांबळे यास पुढील तपास कामी पोलीस ठाणे अहमदपूर यांचे ताब्यात देण्यात आले. दरम्यान पोलीस ठाणे अहमदपूर व स्थानिक गुन्हे शाखा यांच्या संयुक्त पथकाने तपास करून पोलीस ठाणे अहमदपूर येथे दाखल असलेल्या सोनसाखळी चोरीच्या आणखी तीन गुन्ह्यांतील जवळपास तीन तोळे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहे.‎याप्रमाणे सदर कारवाईत आरोपी कडून एकूण जवळपास 4.3 तोळे सोन्याचे दागिने, सध्याच्या बाजारभावा नुसार अंदाजे 6 लाख 50 हजार रुपये किमतीचा सोन्याच्या दागिन्याचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एकूण पाच गुन्हे उघडकीस आणण्यात लातूर पोलिसांना यश आले आहे.ही कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व पोलीस ठाणे अहमदपूर यांच्या संयुक्त पथकाने पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर व पोलीस निरीक्षक विनोद मेत्रेवार यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार संजय कांबळे, सूर्यकांत कलमे, राजेश कंचे, मोहन सुरवसे, विजय पाटील, तुळशीराम बरुरे, पाराजी पुटेवाड, हरी पतंगे, चंद्रकांत केंद्रे, महिला पोलीस अंमलदार सुरेखा मदने, अंजली गायकवाड तसेच पोलीस ठाणे अहमदपूर येथील पोलीस अंमलदार बी. पी. साळवे व जायभाये यांनी केली आहे.‎बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीचा फायदा घेऊन होणाऱ्या चोरीच्या घटनांवर आळा घालण्या साठी लातूर पोलीस दल सातत्याने दक्ष आहे. नागरिकांनी प्रवास करताना आपल्या मौल्यवान वस्तूंबाबत विशेष काळजी घ्यावी तसेच संशयास्पद व्यक्ती आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्यास माहिती द्यावी, असे आवाहन लातूर पोलिसांकडून करण्यात आले आहे.

error: Content is protected !!