बाळासाहेब आंबेडकर यांचा वाढदिवस वृक्ष लागवड करून साजरा
अहमदपुर ( गोविंद काळे ) : वंचितांचे, बहुजनांचे कैवारी , बाबासाहेबांच्या स्वप्नातील वंचितांचे सुराज्य निर्माण करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेणारे नेते बाळासाहेब आंबेडकर.त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सुनेगाव( सांगवी ) येथे शिवाजीराव ढवळे यांच्या शेतात अहमदपूर तालुका वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वृक्ष लागवड चळवळीचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी वंचितच्या नेत्या तथा अहमदपूर-चाकूर विधानसभा उमेदवार माजी पं स सभापती अहमदपूर आयोध्याताई केंद्रे यांच्या हस्ते हजारो वर्ष आयुष्य असणारे आणि 24 तास ऑक्सिजन देणारे पिंपळ वृक्ष(बोधिवृक्ष) , आंबा ,नारळ अश्या विविध प्रकारच्या झाडांची लागवड करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी आयोजीत कार्यक्रमास वंचितचे तालुकाध्यक्ष सहदेवजी होनाळे, तालुका उपाध्यक्ष उत्तमरावजी गोरे, भिमरावजी कांबळे, विनयकुमार ढवळे सर ,सुरेखाताई सिरसाठ, गुणवंत ढवळे आदि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. वाढदिवसाच्या निमित्ताने बाळासाहेब आंबेडकर यांना निरोगी व उदंड आयुष्याच्या शुभेच्छा सर्वांनी देऊन या वर्षात 5000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प करण्यात आला.