शहरात कोविड लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा – नगरसेविका अनुराधा नळेगावकर

शहरात कोविड लसीकरण केंद्रांची संख्या वाढवा - नगरसेविका अनुराधा नळेगावकर

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरात लसीकरण केंद्र वाढवावीत म्हणून नगरसेविका अनुराधा नळेगावकर यांनी लेखी निवेदनाद्वारे आरोग्य विभागाकडे मागणी केली आहे. शहरात एकमेव ग्रामीण रूग्णालय येथे कोविड लसीकरण केंद्र आहे. या लसीकरण केंद्रात नांव नोदणी, पहिली लस व दुसरी लस अशासाठी एकाच ठिकाणी होत असलेली मोठी गर्दी तसेच १मे पासून आठरा वर्षावरील व्यक्तीस लसीकरण करण्यात येत असल्यामुळे होणारी मोठी गर्दी होऊन त्यांची गैरसोय होणार असून शारीरिक अंतर नियमांचे उल्लंघन होणार असून कोरोना संक्रमित होण्याची भिती व्यक्त केली जात असून हे टाळण्यासाठी कोविड लसीकरण केंद्र संख्या वाढवावी म्हणून वैद्यकीय अधिक्षक डाॅ.दत्तात्रय बिराजदार यांच्या कडे नगरसेविका अनुराधा नळेगावकर यांनी एका निवेदनाद्वारे मागणी केली आहे. यावेळी उपविभागीय अधिकारी प्रमोद कुदळे, तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, डाॅ.जयप्रकाश केंद्रे यांची उपस्थिती होती.

About The Author