अहमदपूर आगाराचे १ कोटी ४० लाख उत्पन्न बुडाले

अहमदपूर आगाराचे १ कोटी ४० लाख उत्पन्न बुडाले

एसटी महामंडळ : अहमदपूर आगाराच्या बसच्या प्रत्येक फेरी नंतर बस निर्जंतुक करण्यात येत आहे .

१९ दिवसांत लालपरीला ११ लाख

अहमदपूर (गोविंद काळे) : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊन करण्यात आल्याने एसटी महामंडळाच्या अंतर जिल्हा व लांब पल्याचे बसेस १९ दिवसापासुन जागेवरच आहेत. १९ दिवसांत अहमदपूर आगाराच्या बसेसच्या ५७९ फेऱ्या झाल्या असून १९ दिवसांत केवळ ११ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे. अंतर जिल्हा व लांब पल्याच्या बससे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने वाहतूक सेवा बंद करण्यात आली. जवळपास १९ दिवसांपासुन बससेवा बंद आहे. शासनाने जिल्ह्याअंतर्गत बससेवा सुरु करण्याची मुभा दिलेली आहे.
जिल्ह्याअंतर्गत म्हणावे तसे प्रवासी मिळत नसल्याने या आगारातून केवळ लातूर आणि उदगीरसाठी बससेवा सुरु आहे.
सध्याच्या टप्प्यात जिल्हा ते तालुका अशी बससेवा सुरु आहे. त्यानुसार अहमदपूर आगाराने लातूरसाठी ७ बसेस, उदगीरसाठी ५ अशा एकूण १२ बसेस सुरु आहेत. प्रत्येक फेरी नंतर बस निर्जंतुक करण्यात येत आहे. दररोज ४० फेऱ्या होत आहेत. १० एप्रिल ते २९ एप्रिल या कालावधीत अहमदपूर आगारातील बसेसच्या ५७९ फेऱ्या झाल्या आहेत. त्यातून केवळ ११ लाख ४३ हजारांचे उत्पन्न मिळाले आहे.
आगाराचे १ कोटी ४० लाख उत्पन्न बुडाले आहे. जिल्ह्याअंतर्गत बस सुरू असल्याने प्रवाशांचा प्रतिसाद मिळत नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक दिवसभर घराबाहेर पडणे टाळत आहेत. तसेच रात्रीही नागरिक प्रवास करीत नाहीत.सध्या खरीप हंगामास सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांची तालुक्याच्या ठिकाणी ये-जा सुरु आहे. मात्र बस सेवा नसल्याने अडचण होत आहे.

दररोज धावतात १२ बसेस

अहमदपूर येथील आगारात ७८ बसेस आहेत. चालक वाहकांसह अन्य कर्मचारी असे एकूण ४९० कर्मचारी आहेत. सध्या दररोज लातूर ७ बसेस व उदगीर ५ बसेस धावत आहेत. उर्वरित बस आगारातच उभ्या आहेत. सध्या सुरु असलेल्या बसेस रिकाम्या धावत आहेत. प्रवासी मिळत नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. सध्या लांब पल्याचे अंतर जिल्हा बसेस १९ दिवसापासुन बसेस बंद असल्याने आगारास जवळपास १ कोटी ४० लाखांचा फटका बसला आहे.ऐन खरीप हंगाम व लग्नसराईतच बसेस बंद असल्यामुळे एसटीचे उत्पन्न बुडाले आहे.

ऐन खरीप हंगामात अडचण

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून ग्रामीण भागात एकही बस धावली नाही. शिवाय, खासगी प्रवासी वाहतूकही बंद आहे. आता खरीप हंगामासाठी आम्हाला तालुक्याच्या ठिकाणी जावे लागत आहे. तसेच विविध शासकीय कामानिमित्ताने तालुकाच्या गावी जावे लागते. मात्र, बस नसल्याने अडचणी येत आहेत. बहुतांश वेळा खाजगी वाहनांचा अथवा दुचाकीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे बससेवा सुरु करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांच्या वतीने केली जात आहे .

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. संचारबंदी आदेशाची घोषणा करून महाराष्ट्रातील अंतर्गत व आंतरराज्य वाहतूक , अंतर जिल्हा वाहतूक व्यवस्था बंद करण्याची घोषणा केल्यामुळे अहमदपूर बसस्थानकातून
आंतरराज्य, अंतर जिल्हा वाहतूक बंद आहे. अगोदर आगारातून दिवसाला सुमारे २५० बसेस येतात व २५० बसेस जातात. यात जिल्ह्याबाहेरील व परराज्यातील बसेसचा समावेश आहे. महामंडळानेही आगारातील २१० फेऱ्या रद्द ठेवल्या आहेत. लांब, मध्यम पल्ल्यासह ग्रामीण भागातील सर्व बसफेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.बसस्थानकांवर
पूर्णपणे शुकशुकाट दिसून येत आहे.कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी जिल्ह्यांतर्गत वाहतूक बंद केली आहे. त्यामुळे नागरिक घराच्या बाहेर पडत नसल्यामुळे आगाराचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे.पुढे वेळ प्रसंगानुसार निर्णय घेण्यात येईल, असे आगारप्रमुख एस. जी. सोनवणे म्हणाले.

About The Author