अहमदपूर : नुर काॅलनी वासियातर्फे मुख्याधिकारी यांना निवेदन सफाई करण्याची नागरिकांची मागणी
नगरपालिकेचे नालेसफाईकडे दुर्लक्ष
अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील थोडगा रोड मुख्य रस्त्यावरील नूर कॉलनी भागात नाल्याची अद्याप सफाई करण्यात आलेली नाही. नूर कॉलनीतील अनेक भागातील नाल्यांमध्येही कचरा साचलेला आहे. अनेक नाल्यांमध्ये कचरा साचल्याने या भागात नालीवरून पाणी वाहते. या भागातील नाले सफाई करणे आवश्यक असताना नगरपालिकेचे अद्याप याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येते.
या नाल्यांमध्ये कचरा साचला आहे. प्लास्टिक कॅरीबगचा खचही साचला आहे. यामुळे नाल्यातील पाणी रस्त्यावर येत आहे. या भागात अनेकदा नाल्याच्या पाणी रस्त्यावर वाहून परिसर जलमय होतो. त्यामुळे नाल्याची सफाई लवकरात लवकर करावी अशी मागणी करण्यात येत आहे.
नुर काॅलनी येथे घाणीचे साम्राज्य
नुर काॅलनी परिसरात मागील काही वर्षांपासून घाणीचे साम्राज्य मोठ्या प्रमाणात वाढले आहे.पाण्यासाठी पाइपलाइन करिता खड्डे खोदून ठेवलेले आहेत पण अद्याप नळाच्या कनेक्शनचा थांगपत्ता नाही.त्या खड्ड्यामुळे वयस्कर नागरिकांना प्रचंड नाहक त्रास सहन करावा लागत आहे.तसेच गल्लीतील नाल्या कचऱ्याने प्रचंड प्रमाणात तुंबल्या आहेत.सफाईकरिता संबंधित ठेकेदाराला बोलल्यानंतर उडवाउडवीची उत्तरे देत आहे.तसेच काॅलनीतील अंतर्गत रस्ते सुद्धा अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून सदरील रस्ते पूर्णतः नवीन होणे गरजेचे आहे पण या बाबींकडे कोणीही लक्ष देत नाही. या साऱ्या बाबीस कंटाळून अॅड. जुनेद सौदागर, मुदस्सर शेख, अकबर खुरेश, आजम शेख, मेहराज सय्यद, रफियोद्दीन मुंजेवार,खय्युम शेख, माजीद शेख व काॅलनीतील नागरिकांतर्फे मुख्याधिकारी नगर परिषद अहमदपूर यांना निवेदन देण्यात आले.