जगण्या मरण्याच्या प्रवासात १०८ रुग्णवाहिका ठरतेय जिवनदायीनी
तालुक्यातील २ हजार २३ गंभीर रुग्णांना पोहचविले सुखरूप
अहमदपूर (गोविंद काळे) :अपघात किंवा आपत्कालीन परिस्थितीमध्ये जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत करण्यासाठी सुरू झालेली १०८ ही सेवा जिल्ह्यातील व तालुक्यातील हजारोंना जीवनदान देणारी ठरली आहे. अनेक रुग्णांना जीवनदान देण्याचे काम या सेवेमुळे शक्य झाले आहे.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने लातूर जिल्ह्यासह तालुक्यात जागातिक आरोग्य दिन ७ एप्रिल २०१४ पासुन आपत्कालीन वैद्यकीय सेवा सुरू केली आहे. अपघाताच्या ठिकाणावरून कोणीही १०८ या क्रमांकावर फोन केल्यावर तातडीन रुग्णवाहिका येऊन रुग्णांना रुग्णालयात दाखल करत आहे. लातूर जिल्हा व तालुक्याला कोरोना घट्ट विळखा घालून बसला आहे. कोरोनावर मात करून आपला लौकिक कायम ठेवण्यासाठी सध्या राज्याची सर्वच आघाड्यांवर धडपड सुरू आहे. अहमदपूरातही आरोग्य विभाग प्रयत्नात असून रुग्णवाहिका डॉक्टर, पायलटांचा (चालक) जिगरबाजपणा उल्लेखनीय आहे. तालुक्यात २ अत्याधुनिक रुग्णवाहिकां वैद्यकिय पथकासह डॉक्टर व पायलट ( चालक) जीवाची पर्वा न करता मार्च २०२० ते एप्रिल २०२१ या १३ महिन्यात २ हजार २३ गंभीर व कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांना उपचारार्थ सुखरूप पोहचवून रुग्णसेवेची चुणुक दाखविली आहे. महाराष्ट्र शासन व डिव्हीजी ग्रुप पूणे यांच्या संयुक्त विद्यमाने १०८ रुग्णवाहीकेची सेवा गेल्या ७ एप्रिल २०१४ जागतिक आरोग्य दिनापासून सुरू केली आहे.लातूर जिल्ह्यात ही सेवा ७ वर्षांपासून सुरु आहे. ग्रामीण भाग असो किंवा शहरी भाग असो रात्री-अपरात्री कोण कोरोना पॉझिटिव्ह आला की, कूरकूर न करता थेट संबंधित ठिकाणी काही मिनीटातच रुग्णवाहीकेचे पायलट (चालक ), डॉक्टर पोहचून रुग्णाला उपचारार्थ दाखल करतात. ड्यूटीची वेळ, भत्ता याची तक्रार न करता ते वेळेवर रुग्णांची वाहतूक करतात.ही रुग्णसेवेची निष्ठा प्रशंसनीय आहे. कोरोना विषाणूच्या संक्रमणाविषयी संभ्रमाचे वातावरण असताना कोरोना संशयित आणि बाधितांना रुग्णालयात नेण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची सेवा कामी आली आहे.या रुग्णवाहिकांच्या सहाय्याने तालुक्यात आजवर अनेकांना वेळेत रुग्णालयात पोहचवणे शक्य झाले आहे. तालुक्यात कोरोना रुग्णांच्या वाहतुकीसाठी १०८ रुग्णवाहिका दोन उपलब्ध आहेत. या रुग्णवाहिकेतील डॉक्टर आणि पायलट (चालक ) यांना रुग्णांची हाताळणी करण्याच्या दृष्टीने तसेच रुग्णवाहिकेचे निर्जंतुकीकरण करण्याचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय पायलटना (चालक ) रुग्ण हाताळणी दरम्यान मास्क, – हातमोजे, जंतुनाशके, सोडियम हायपोकोराइड तसेच आवश्यक इतर सुरक्षा उपकरणांच्या किट उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या रुग्णवाहिकानी कोरोना बाधित रुग्णांना सेवा दिली आहे. त्याचबरोबर कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्या, सर्दी ताप- खोकला व आजाराची इतर लक्षण आढळलेल्या तसेच उच्च धोका संभवणाऱ्या रुग्णांच्या थुंकीचे नमुने तपासणी अशा संशयित रुग्णांपैकी अधिकतर रुग्णाना १०८ रुग्णवाहिकेमधून प्रवास घडवून आणला आहे. त्याचप्रमाणे अनेक नागरिकांचे वेगवेगळ्या ठिकाणी संस्थात्मक अलगीकरण कक्षात भरती करणे व परत घरी सोडण्याच्या कामी या रुग्णवाहिका सेवेचा लाभ झाला आहे. जिल्हा आरोग्य विभागाच्या मार्गदर्शनाखाली १०८ रुग्णवाहिकेचे तालुक्यात अहोरात्र सेवा सुरू राहिली आहे. कोरोनामुळे आजारी असलेल्या व्यक्तीला नेण्यापासून आजारातून बरा होऊन घरी परतणाऱ्यांनाही १०८ रुग्णवाहिकेने सेवा मिळत आहे.
२ हजार २३ रुग्णांना दिली सेवा
तालुक्यात २ रुग्णवाहिका (१०८ ) कोरोनाकाळात धावत असून जिल्हा व्यवस्थापक डॉ. संदीप राजहंस लक्ष ठेवून आहेत. गेल्या १३ महिन्यात तालुक्यातील
रस्ते अपघातात जखमी झालेले रुग्ण -१३६, मारहाणीत जखमी झालेले रुग्ण -२२, जळीत
(भाजलेले) रुग्ण-३, उंच ठिकाणाहून पडलेले रुग्ण-६, विषबाधा रुग्ण-४५, प्रसूतीसाठी -२७० विज पडलेले रुग्ण-१ मोठा अपघात( दोन ते तीन वाहनांचा ) जखमी -१ कोरोना व इतर आजाराचे १५३८ आसे एकूण २ हजार २३ विविध आजारी रुग्णांना सुखरूप पोहचविण्यात आले आहे. यामध्ये २७० प्रसूती रुग्ण तर १३५१ कोवीड रुग्णांचा समावेश आहे, अशी माहिती १०८ रुग्णवाहिका व्यवस्थापक यांनी दिली.
अहमदपूर तालुुक्यात १०८ रुग्ण्ण वाहिका कोरोना काळात अखंडीतपणेे सेवा देत आहेे. १०८ रुग्णवाहिकावरील डॉक्टर,
रुग्णवाहिका पायलट (चालक ) रुग्णांना देवदूत असल्या सारखेे वाटत आहे. या कोरोना काळात रुग्णवाहिके बद्दल एकही तक्रार
आलेली नाही. तालुक्यात १०८ ही रुग्णवाहिका २४ तास सेवा देत आहे.
डॉ. संदीप राजहंस
व्यवस्थापक १०८ रुग्णवाहिका
महाराष्ट्रात जीवनदायिनी म्हणून नावारुपास आलेली १०८ रुग्णवाहिका कोरोना रुग्णांना सेवा देत आहे. त्यात कोविड-१९ मध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देण्यासाठी १०८ रुग्णवाहिंकांचा वापर होत आहे.अशावेळी कोरोनाच्या संशयितांची तपासणी करण्यासाठी तसेच संशयितां बरोबर कोरोनाग्रस्तांना क्वारंटाईन करण्यात येणाऱ्या सर्वांना ने आण करण्यासाठी १०८ रुग्णवाहिकांची सेवा उपयुक्त ठरत आहे.कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी १०८ क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर अवघ्या काळी वेळात १०८ रुग्णवाहिकासह त्या रुग्णांना घेण्यासाठी जात आहे.
यावेळी रुग्णांना तातडीची वैद्यकीय सेवा देत आहोत.ज्या रुग्णांना कोरोनाची बाधा झाली आहे. अशा सर्व कोरोनाग्रस्त रुग्णांना रुग्णवाहिकांमधून सेवा दिली जात आहे. १०८ रुग्णवाहिकेचे डॉ. उबेद जाहागिरदार पायलट (चालक) राहूल हुडगे, पायलट ( चालक ) गव्हाणे यांना मार्च २०२० वर्षी तालुक्यातील खंडाळी येथे पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासुन आजपर्यत रुग्णांची चोवीस तास सेवा देत आहेत. आमची यापुढेही कोरोना काळात रुग्णांची अखंडीत पणे सेवा चालू राहणार आहे.खास कोविड-१९ साठी १०८ रुग्णवाहिकांचा वापर सुरु आहे. आम्ही सर्व रुग्णांची व्यवस्थित काळजी घेवून सेवा देत आहोत असे डॉ. उबेद जाहगिरदार, पायलट राहूल हुडगे, पायलट भानूदास गव्हाणे यांनी सांगितले.
१०८ रुग्णवाहिकेवरील डॉक्टर पायलट ( चालक ) तटपूज्यां पगारावर करतात काम
१०८ रुग्णवाहिके वरील डॉक्टर पायलट ( चालक ) हे आपल्या परिवारापासून दूर राहून कोरोना काळात चोवीस तास रुग्णांना सेवा देत आहेत.रुग्णसेवेची सेवा करत असल्याने हे प्रशंसनीय आहे. या कोरोना काळात खरे हिरो हेच आहेत. मात्र यांना तटपूज्यां पगारावर काम करावे लागत आहे.कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाला तर त्या रुग्णांचे नातेवाईक रुग्णांपासुन लांब राहत आहेत. मात्र १०८ रुग्णवाहिकेची सर्व टिम त्या पॉझिटिव्ह रुग्णास आपल्या कुटुंबातील सदस्या प्रमाणे त्याची विचारपूस करून त्या पॉझिटिव्ह रुग्णांची सर्व प्रकारची काळजी घेत रुग्णालयात दाखल करत आहेत.व परत सुखरुप त्या रुग्णांस घेऊन येत आहेत. महागाईत या दररोज होणाऱ्या भाव वाढीत तटपूंज्या वेतनावर
त्यांच्या परिवारांचे पोट भागात नाही. तरी शासनाने वेतन वाढ करावी अशी मागणी केली जात आहे.