३२ हजार २३५ कुटुंबांना रेशनच्या धान्याचा आधार
अहमदपूर (गोविंद काळे) : जिल्ह्याह्यासह तालुक्यातील परिसरात सध्या कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाने सर्वत्र बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. महत्त्वाच्या कामासाठी सकाळची वेळ सोडली तर इतर वेळी नागरिकांना घराबाहेर पडण्यास निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे सर्वत्र कामधंदे ठप्प आहेत. अशातच मोलमजुरी करणाऱ्या मजुरांची स्थिती भयावह आहे. त्यातच आता आणखी काही दिवसांसाठी ‘ब्रेक द चेन’ या लॉकडाऊन सुरु झाल्यामुळे मजूर वर्गाच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अधिक बिकट झाला आहे.
जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन प्रयत्न करत आहे. तसेच नागरिकांकडून प्रतिसाद मिळत आहे.यात हातावर पोट असणाऱ्यांवर आर्थिक संकट निर्माण होत आहे. एकीकडे कोरोनाची भीती तर दुसरीकडे आर्थिक संकटाची भीती निर्माण झाली आहे.
अगोदरच कामधंदे बंद झाल्यामुळे मजूर वर्गाची आर्थिक स्थिती बिकट झाली आहे. पुन्हा लॉकडाऊन वाढविल्यामुळे मजुरांच्या संकटामध्ये भर पडली आहे. मजूर वर्गासाठी शासनाने मदतीच्या हात दिला आहे.
शासनाने अशा अडचणीच्या कालावधीत गोरगरिब, हातावर पोट असलेल्यांसाठी राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत मोफत गहू, तांदूळ उपलब्ध करुन दिली. त्यामुळे तालुक्यातील ३२ हजार २३५ शिधापत्रिकाधारकांना आधार मिळाला आहे.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने लॉकडाऊन केले. दरम्यान, उद्योग व्यवसाय बंद असल्याने गोरगरिब, हातावर पोट असलेल्यांपुढे उदरनिर्वाहाची समस्या निर्माण झाली. अशा परिस्थितीत शासनाने शिधापत्रिकेवर मोफत गहू, तांदुळ, देण्यास सुरुवात केली.तालुक्यात अंत्योदय योजनेअंतर्गत ४ हजार ९९ कार्ड धारक लाभार्थी आहेत. तसेच प्राधान्य कुटुंब लाभार्थी अंतर्गत २८ हजार १३६, कार्डधारक लाभार्था आहेत. एकून ३२ हजार २३५ शिधापत्रिकाधारक कुटुंब आहेत. या शिधापत्रिकाधारकांना शहरातील १५ तर ग्रामीण भागातील १५० अशा १६५ रेशन दुकानातून धान्याचे वितरण केले जात आहे. शासनाच्या वतीने मे मध्ये अंत्योदयसाठी १५८१ क्विंटल गहू, ९१७ क्विंटल तांदूळ
प्राधान्य कुटुंबासाठी ९०६० क्विंटल गहू, ६०४०क्विंटल तांदूळचे मोफत वाटप होणार आहे. तर शेतकरी गटातील ६ हजार ७९२ शिधापत्रिकाधारकांना दरमहा प्रमाणे याही महिन्यात पैसे घेऊन धान्याचे वितरण होणार नाही. मे महिन्याचे धान्य वितरण सुरु करण्यात आले आहे. मे मध्ये नियमित धान्याबरोबर प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील (अंत्योदय, अन्नसुरक्षा लाभार्थी) प्रत्येक व्यक्तीस ३ किलो गहू २ किलो तांदूळ मोफत वाटप करण्यात येणार आहे. शासनाच्या योजनेमुळे गोरगरिब कुटुंबांना आधार मिळाला आहे.
३२ हजार २३५ कुंटूंबांना राज्य शासनाने में २०२१ चे नियमीत असलेले धान्य अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी यांना मोफत वाटप करण्याबाबतच्या सूचना आहेत. त्याप्रमाणे जिल्हा पुरवठा अधिकारी लातूर, सदाशिव पडदुने व तहसिलदार प्रसाद कुलकर्णी यांचे मार्गदर्शनाखाली रास्तभाव दुकानदारांमार्फत वाटप करण्यात येत आहे. तसेच, केंद्रशासना मार्फत वरील लाभार्थी यांना प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना में २०२१ व जून २०२१ या दोन महिण्यासाठी नियमीत धान्यासोबत अतिरिक्त धान्य मोफत वाटप करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. त्यानुसार लाभार्थ्यांनां प्रति सदस्य गहु ३ किलो तांदुळ २ किलो याप्रमाणे वितरीत करण्यात येत आहे. सदर धान्य वाटपासाठी बी. जी. मिट्टेवाड व गोदामपाल राजकुमार भगत अहमदपूर हे परिश्रम घेत आहेत. नायब तहसीलदार पुरवठा विभाग, डि.के. मोरे.