ग्रामस्थांच्या आरोग्याची नैतिक जबाबदारी सरपंचाचीच – मनोज चिखले
उदगीर (एल.पी. उगिले) : प्रत्येक गावातील नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेऊन नागरी सुविधा पुरवण्याची नैतिक जबाबदारी सरपंचाचीच आहे. असे विचार युवा नेते मनोजभैया चिखले यांनी व्यक्त केले. उदगीर शहराचे उपनगर असलेल्या शेल्हाळ गावातील नागरिकांना आपल्या वतीने मनोजभैया चिखले यांनी गावातील लोकांना कोरोना विषाणूचा संसर्गापासून दूर ठेवण्याच्या उद्देशाने मास्क आणि सॅनिटायझरचे वाटप केले. याप्रसंगी ते बोलत होते.
शेल्हाळ गावच्या नागरिकांनी आपल्यावर विश्वास ठेवून प्रचंड बहुमताने आपले पॅनल विजयी करून जो विश्वास आपल्यावर दाखवला आहे. त्या विश्वासाला पात्र राहून गावच्या सर्वांगीण विकासाचे प्रश्न मार्गी लावू. असे आश्वासनही याप्रसंगी मनोज भाऊ चिखले यांनी दिले. शेल्हाळ हे गाव उदगीर शहरापासून हाकेच्या अंतरावर असले तरी अनेक सुविधा पासून वंचित आहे. त्या सर्व सुविधा गावकऱ्यांना मिळवून देण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करणार असल्याचेही याप्रसंगी त्यांनी सांगितले. गावातील गोरगरीबांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी देखील शासकीय स्तरावरून आपण सर्वतोपरी प्रयत्न करू, असे आश्वासनही त्यांनी दिले आहे. याप्रसंगी बाबुराव नामदेवराव बिरादार, धनाजी मामा कोयले, सुर्यकांत जाधव, गोविंद नारायण मोरे, सुरेश मोरे, शिवाजी मोरे, तानाजी देवनाळे, ग्रामसेवक पी. वाय. पवार इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
याच दिवशी शेल्हाळ येथे महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरी चे मार्क आऊट घेण्यात आले. हे मार्कआऊट देण्यासाठी अभियंता हिरेमठ, ग्राम रोजगार सेवक विशाल गोजेगावे, ग्रामसेवक पवार, सरपंचाचे प्रतिनिधी म्हणून मनोजभाऊ चिखले तसेच या सिंचन विहिरीचे लाभार्थी सचिन गणपत मोरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते. सरपंच पदाचा सन्मान मिळाल्यानंतर मनोजभाऊ चिखले यांनी धडाकेबाज काम करून गावच्या विकासाला गती दिल्याबद्दल ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.