सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम – प्रा. बालाजी कारामुंगीकर

सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम - प्रा. बालाजी कारामुंगीकर

अहमदपूर (गोविंद काळे) : सोशल मिडियाचा मालक आपण स्वतः असल्याने त्याच्या वापर विधायक व परिवर्तनासाठी केला पाहिजे सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी माध्यम असल्याचे प्रतिपादन प्रा. बालाजी कारामुंगीकर केले.
ते प्रबोधन शिबीर 2021 या ग्रुपवर आज दि. 9 मे 2021 रोजी दु. 2.00 वाजता गुगल मिटवर आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी लसाकमचे संस्थापक नरसिंग घोडके, प्रदेश अध्यक्ष बालाजी थोटवे, प्रदेश महासचिव राजकुमार नामवाड, प्रदेश प्रवक्‍ता डॉ. मारोती कसाब, शिरीष दिवेकर, जिल्हाध्यक्ष मधुकर दुवे यासह कार्यकारणीतील सदस्य, कार्यकर्ते उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. कारामुंगीकर म्हणाले की, सोशल मिडीया हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन असून ते समाज जीवनाच्या सर्व अंगात मोठ्या प्रमाणात वापरले जात आहे. मातंग समाजातील तरूणांनी याचा पुरेपुर वापर करून घ्यावा. समाज परिवर्तनाच्या चळवळीनी यांचा वापर ग्रामीण जीवनाशी जोडल्यास विकास होईल. शैक्षणिक , सांस्कृतिक व राजकीय क्षेत्रात यांचा विधायक वापर करता येतो. सध्याच्या काळात राजकीय सत्ता उलटून टाकणे आणि निवडणूक जिंकणे यामध्ये सोशल मिडीयाचा वापर निर्णायक ठरते आहे. सोशल मिडीया व मुख्य प्रवाहीतील मिडीया ( डेलळरश्र चशवळर रपव ारळप ीीींशरा ाशवळर ) यामधील फरक स्पष्ट करताना एश्रशलीीेंपळल रपव िीळपीं ाशवळर च्या मालकानूसार वापर होतो. परंतु सोशल मिडीयाचा मालक आपण स्वतः असल्याने त्याचा वापर विधायक व परिवर्तनासाठी केले पाहिजे. सामाजिक माध्यमांचे हजारो ऍप्स आज घडिला उपलब्ध आहेत. यातील बहुतेक सर्वच एप्सचा वापर विनामुल्य करता येवू शकतो. आपले विचार, भावना, आपल्यातील कला लोकांपर्यंत पोहचविण्याचे एक प्रभावशाली माध्यम म्हणुन सामाजिक माध्यकांचा वापर संपुर्ण जगभरात आज होतो आहे.
मातंग समाजातील तरुणांना मला आवर्जुन सांगावेसे वाटते कि सामाजिक माध्यम म्हणजे आपणास भेटलेले एक प्रभावी हत्यार आहे. असं हत्यार त्याचा योग्य प्रकारे उपयोग करुन आपण राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, शेक्षणिक क्षेत्रात प्रगती करु शकतो आणि या सामाजिक माध्यमांचा योग्य प्रकारे वापर करु शकतो. महापुरुषांचा विचारांना जिवंत ठेवुन सद्य परिस्थितीची जाण करुन देण्यासाठी व्हॉट्सअप, फेसबुक, टेलिग्राम, ट्विटर, इंस्टाग्राम यासारख्या विविध माध्यमांचा उपयोग केला जावू शकतो. गुगल मिट, झुम ऍप सारख्या माध्यमांचा वापर करुन डायरेक्ट मिटिंग घेवून समाजातील तरुणांना एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केला जावू शकतो. महापुरुषांचे विचार, त्यांचे पीडीएफ रुपातील ग्रंथ, गुगलवर उपलब्ध विविध प्रकारची माहिती आपण समाजापर्यंत पोहचू शकतो. सामाजाचे वास्तव चित्र जगापुढे आपण ठेवू शकतो. समाजाला दिशा देण्याचे कार्य सामाजिक माध्यमांच्या उपयोगाने तरुणांनी करावे असेही ते शेवटी म्हणाले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बालाजी थोटवे यांनी केले तर उपस्थितांचे आभार हिंगोलीचे आत्माराम गायकवाड यानी मानले.

About The Author