रेमडीसिवर शिवाय पद्मीनबाई तुळशीराम वाढवणकर कोरोना मुक्‍त

रेमडीसिवर शिवाय पद्मीनबाई तुळशीराम वाढवणकर कोरोना मुक्‍त

अहमदपूर (गोविंद काळे) : पद्मीनबाई तुळशिराम वाढवणकर या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णास डॉ. कदम यांनी बिना रेमडिसीवर चा वापर न करता कोरोनामुक्‍त केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, येथील कदम हॉस्पिटल व कोव्हीड सेंटर , अहमदपूर येथे डॉ. पी.एस. कदम यांच्या सीटी स्कॅन स्कोर बारा असुनही रेमडीसिवर शिवाय उपचार करुन कोरोना मुक्‍त केले आहे. पद्मीनबाई वाढवणकर ह्या पत्रकार शिवाजी वाढवणकर पाटील यांच्या मातोश्री आहेत. डॉ. कदम यांनी सीटी स्कॅन स्कोर बारा असताना सुद्धा अ‍ॅडमिट करुन त्यांच्यावर व्यवस्थितरित्या 15 दिवस सुशुश्रा करुन मदर्स डे दिवशी डिस्चार्ज करुन त्यांच्या परिवारातील सदस्यांना एका अर्थाने या दिवशी आईची भेट दिली आहे. मद्मीनबाई यांची आज रोजीला तब्येत एकदम चागली असुन त्यांनी डॉ. कदम व त्यांच्या टिमचे आभार मानले.

About The Author