उदगीर चे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

उदगीर चे उपजिल्हाधिकारी कोरोना पॉझिटिव्ह, शासकीय रुग्णालयात उपचार सुरू

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर चे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांना कोरोनाची लागण झाली असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.  बुधवार 5 मे रोजी त्यांची स्वॅब टेस्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने सांगण्यात आली आहे.उदगीर चे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी हे लॉकडाऊन व संचार बंदी काळात जनतेच्या अडचणी व मदत करण्यासाठी अहोरात्र परिश्रम घेत स्वत: रस्त्यावर उतरून जनतेला प्रशासनाने जे नियम घालून दिले त्याची अमल बजावणी करत होते.उदगीर चे उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांना कोविड ची लक्षणे दिसू लागल्याने 4 मे रोजी त्यांनी विनाविलंब तपासणी करून घेतली. 5 मे रोजी ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी कोणत्याही मेट्रो सिटीत उपचारासाठी दाखल न होता उदगीर येथील कोविड शासकीय रुग्णालयात जाणार असल्याचे सांगितले. त्यांच्या या निर्णयाचे जनतेतून स्वागत होत आहे. उपजिल्हाधिकारी प्रवीण मेंगशेट्टी यांनी स्वत: देखील उदगीर येथील रुग्णालयात कोविडचे उपचार घेत असल्याची माहिती दिली आहे.

About The Author