कोरोना संकटातही पैसे कमावण्याचे साधन समजणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील आणखी महा भागावर दंडात्मक कारवाई

कोरोना संकटातही पैसे कमावण्याचे साधन समजणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील आणखी महा भागावर दंडात्मक कारवाई

लातूर (प्रतिनिधी) : साप्ताहिक पोलीस फ्लॅश न्यूज या वृत्तपत्राने आणि वृत्तवाहिनीने काही दिवसांपूर्वीच लातूर येथील एका कोविड सेंटर मधून एका विधिज्ञाला अतिरिक्त बिल घेऊन लुबाडण्याचा प्रकार चव्हाट्यावर आणला होता. या प्रकरणाच्या अनुषंगाने देखील अनेक महाभागांनी त्या डॉक्टरांची बाजू घेतली होती. मात्र जिल्हा प्रशासनाच्या वतीने आकारण्यात आलेल्या बिलाचे ऑडिट केल्यानंतर अतिरिक्त बिल आकारल्याचे स्पष्ट झाले होते. शासनाच्या सूचना पेक्षा ज्यादा आकारलेले बिल तक्रारदारांना परत करावे. अशा पद्धतीचे आदेश नोडल अधिकाऱ्यांनी दिले आहेत.

 या प्रकरणाची चर्चा थांबते ना थांबते तोच लातूर शहरातील निर्णय लॅब या कोरोना चाचणी घेणाऱ्या लॅबला करोना च्या संदर्भात चाचणी घेण्याचे अधिकार दिले होते. प्रशासनाच्या वतीने परवानगी देण्यात कोरोना चाचणीस आलेल्या नागरिकाकडून शासनाने ठरवून दिलेल्या प्रती चाचणी पाचशे रुपये अशा पद्धतीच्या बिला ऐवजी लॅबच्या वतीने बाराशे रुपये फी घेऊन रुग्णांची लूट केली जात होती. अशा पद्धतीची तक्रार उपलब्ध झाल्यानंतर महानगरपालिकेचे आयुक्त मित्तल यांच्या आदेशावरून झोन डी चे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे यांनी लॅबला दहा हजार रुपयांचा दंड ठोठावून तो वसूल केला आहे.

 अत्यंत मग्रूर पणे लॅब मधील कर्मचाऱ्यांची रुग्ण सोबतच्या व्यवहाराची ही चर्चा चव्हाट्यावर आली आहे. या लॅबमध्ये चाचणी अहवालाची आदलाबदल झाल्याच्या ही तक्रारी आहेत. आरटीपीसी र या चाचणीसाठी शासनाने किती पैसे घ्यायचे? हे ठरवून दिले आहेत. एखादा रुग्ण लॅबमध्ये येऊन चाचणी करत असेल तर त्याच्याकडून पाचशे रुपये फी निश्चित केली आहे, पण या लॅबमध्ये चाचणी साठी येणाऱ्या प्रत्येकाकडून बाराशे रुपये उकळले जात होते. अशीच तक्रार आहे. ही बाब काही रुग्णांनी महापालिकेच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा पालिका आयुक्त अमन मित्तल यांच्या मार्गदर्शनाखाली झोन डी चे क्षेत्रीय अधिकारी बंडू किसवे, स्वच्छता निरीक्षक धोंडीराम सोनवणे, रवी कांबळे व अन्य कर्मचाऱ्यांनी निर्णय लॅब मध्ये जाऊन खात्री केली. प्रत्येक रुग्णाकडून बाराशे रुपये घेत असल्याचे निष्पन्न झाले. तेव्हा या लॅब चालकाला या पथकाने दहा हजार रुपयांचा दंड ठोठावून तो त्यांच्याकडून वसूल केला आहे.

 या लॅबच्या विरोधात केवळ दंडात्मक कारवाई करून चालणार नाही. तर त्यांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करावा. अशी मागणी अनेकांनी केली आहे. एका बाजूला राष्ट्रीय आपत्ती म्हणून कोरोना कडे पाहिले जात असताना, माणुसकी विसरून, सामाजिक जाण गहाण ठेवून काही विकृत प्रवृत्ती केवळ पैसा कमवण्यासाठी अशाही परिस्थितीत रुग्णांना त्यांच्या मजबुरीचा गैरफायदा घेऊन लुटत आहेत. अशा लोकांवर कठोर कारवाई केली जावी, अशीही मागणी केली जात आहे.

About The Author