प्रत्येक गावाच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देईन – आ. बनसोडे
उदगीर (एल.पी. उगीले) : उदगीर विधानसभा मतदारसंघातील एकही गाव विकासापासून दूर राहणार नाही. प्रत्येक गावासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल. असे आश्वासन उदगीरचे आमदार तथा माजी गृहराज्यमंत्री संजय बनसोडे यांनी दिले. ते उदगीरचे उपनगर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मलकापूर येथील शिवनगरच्या हनुमान मंदिर सभागृहासाठी वीस लाखाचा निधी जाहीर करताना बोलत होते. हनुमान मंदिर येथे ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून संजय बनसोडे निमंत्रित होते. याप्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, मतदार संघाच्या विकासा साठीच जनतेने मला विश्वास दाखवून निवडून दिले आहे. याची जाण मी कायम ठेविन. या ज्ञानेश्वरी पारायण सांगता सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मलकापूरचे सरपंच गुरुनाथ बिरादार हे होते. प्रमुख उपस्थितामध्ये प्रा. मल्लेश झुंगास्वामी हे होते.
पुढे बोलताना आ. बनसोडे म्हणाले की, मलकापूर गावासाठी सोळा कोटी रुपयांची पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे, त्या योजनेचे पाईप टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामामुळे काही ठिकाणी रस्ते फोडावे लागत आहेत, त्यामुळे नागरिकांची थोडीशी गैरसोय होईल. मात्र पुढे पाण्याची कायमस्वरूपी सुविधा होणार आहे. तसेच रस्ते दुरुस्तीचे ही काम युद्ध पातळीवर होईल. भविष्यकाळातही मलकापूर गाव आणि नवीन वसाहतीच्या विकासासाठी भरपूर निधी दिला जाईल, असे आश्वासन देतानाच मूलभूत योजनेतून सभागृहासाठी वीस लाखाचा निधी देण्याचे त्यांनी जाहीर केले.
याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. मल्लेश झुंगास्वामी त्यांनी सांगितले की, गेल्या 35 वर्षात झाले नाहीत त्यापेक्षा जास्त विकासाची कामे आ. संजय बनसोडे यांच्या काळात होत आहेत. उदगीरचे विकास पुरुष म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. असे विकासाची जाण असणारे नेतृत्व उदगीरच्या जनतेने जपले पाहिजे. असे आवाहनही केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक राम मोतीपवळे यांनी तर सूत्रसंचालन आनंद हुरदळे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वी साठी ज्ञानेश्वर सावळे, रवी मुळे, संगमेश्वर कस्तुरे, रवींद्र साकोळकर, महेश तोडकर, शिवलिंग मुळे, संतोष केंद्रे, राजेंद्र लामतुरे, अशोक पवार, संजय स्वामी, अमित जाधव, विठ्ठल मुळे, अण्णाराव माने, माधव हलगरे, अशोक कप्ते, सुरेश राजपाल, अनिता सावळे वैशाली बिरादार, सावित्रा माने, सत्यभामा गुरुडे, कांताबाई वलसे, प्रेमाला बिरादार, राधाबाई कुलकर्णी, अनिता माने, सरोजा गुरुडे, सुरेखा कोटलवार इत्यादींनी विशेष परिश्रम घेतले. विजय बैले यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमासाठी शिवनगर भागातील नागरिक, भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.