मतदारांच्या विश्वासाला पात्र राहीन – शिवाजीराव हुडे

मतदारांच्या विश्वासाला पात्र राहीन - शिवाजीराव हुडे

उदगीर (एल. पी. उगीले) उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये मतदारांनी माझ्यावर आणि माझ्या पॅनलवर जो विश्वास दाखवला आहे. तो विश्वास सार्थ करेन. लोककल्याणाच्या विविध योजना पणन महासंघाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पुन्हा सुरू करून कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक नवा पॅटर्न निर्माण करून दाखवेन. असा विश्वास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनलचे प्रमुख शिवाजीराव हुडे यांनी व्यक्त केला.ते उदगीर येथील उदयगिरी अकॅडमीच्या वतीने आयोजित सत्काराला उत्तर देताना बोलत होते.

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा उदगीर पंचायत समितीचे माजी सभापती प्रा. शिवाजीराव मुळे हे होते, तर सत्कारमूर्ती म्हणून शिवाजीराव हुडे, प्रा. शाम डावळे, विधीज्ञ पद्माकर उगिले ज्ञानेश्वर पाटील, वसंत पाटील, प्रमोद पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

प्रथमतः संस्थापक संचालक प्रा. गोपाळकृष्ण घोडके यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, लोकनेते स्व. चंद्रशेखर भोसले यांच्या कार्यकाळात सभापती शिवाजीराव हुडे यांनी शेतकरी, व्यापारी, कष्टकरी, हमाल, मापाडी यांच्यासाठी खूप योजना राबवल्या होत्या. त्या योजनांचा फायदाही मोठ्या प्रमाणात झाला. तोच आदर्श पुन्हा पूर्ववत निर्माण करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.

सत्काराला उत्तर देताना प्रा. श्याम डावळे यांनी सांगितले की, नेतृत्वाने जो विश्वास आमच्यावर टाकलेला आहे, त्याची जाण ठेवून आम्ही काम करू. जन माणसांमध्ये आमची प्रतिमा उंचावली जावी, अशीच आमची कार्यप्रणाली असेल. बाजार समितीला आदर्श दर्जा प्राप्त करून देऊ. त्यासाठी सर्व संचालक मंडळ प्रयत्न करतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

पुढे बोलताना शिवाजीराव हुडे यांनी सांगितले की, सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन बाजार समितीचे कामकाज पारदर्शक पद्धतीने करून लोकांचा विश्वास संपादन करेन. लोकांच्या हिताचे जे जे प्रकल्प पाणी योजना असतील त्या संदर्भात उदगीर तालुक्यातील जनतेने अवश्य सूचना कराव्यात, त्या सूचनांचे सकारात्मक पद्धतीने विचार करून प्रत्यक्ष अंमलबजावणी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले जातील, असा विश्वास ही त्यांनी बोलून दाखवला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक संतोष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन महेश घोडके आणि संदीप पाटील यांनी केले.

About The Author