आ. सतीश चव्हाण यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

आ. सतीश चव्हाण यांचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते सत्कार

लातूर (प्रतिनिधी) : मराठवाडा पदवीधर मतदार संघातील नवनिर्वाचित आ. सतीश चव्हाण यांनी सोमवारी लातूर येथे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांची भेट घेवुन त्यांचे आभार मानले निवडणुकीत कॉंग्रेस पक्षाने मोठ्या प्रमाणात तसेच आपल्या विविध संस्था, साखर कारखाने, जिल्हा बँक यांनी खूप सहकार्य केले त्याबद्दल त्यानी आभार व्यक्त केले
यावेळी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते आ. सतीश चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

   यावेळी लातूर जिल्हा बँकेचे माजी चेअरमन एस आर देशमुख, जिल्हा कॉंग्रेस चे अध्यक्ष श्रीशैल उटगे, रेणा साखर चे माजी चेअरमन यशवंतराव पाटील, जागृती शुगर चे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, संचालक दिलीप  माने, जिल्हा कॉंग्रेस चे मीडिया सेल चे अध्यक्ष हरिराम कुलकर्णी, राजेसाहेब देशमुख, अँड राजेश्वर चव्हाण, रामदास पवार, चांदपाशा इनामदार, संभाजी रेड्डी, सुपर्न जगताप, किरण पवार, सतीश पाटील, खटके  उपस्तीत होते

About The Author

error: Content is protected !!