सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने सत्कार
लातूर (प्रतिनिधी) : राज्याचे माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मोरे यांना औसा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक म्हणून संधी दिली तसेच साखरेच्या दरांमध्ये होत असलेली नेहमीची घसरण लक्षात घेऊन विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा सहकारी साखर कारखान्यात रसापासून थेट इथेनॉल तयार करून शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे दाम मिळवून देण्यासाठी अतिशय स्तुत्य असा कार्यक्रम राबवला आहे. त्यामुळे ऊस उत्पादकांना नक्कीच एफ आर पी पेक्षा जास्त रक्कम मिळण्याची व्यवस्था होईल तसेच जिल्हा बँकेच्या वतीने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मार्फत जिल्हा बँकेमधून प्रत्येकी तीन लाख रुपयापर्यंत पिक कर्ज तात्काळ मिळण्याची व्यवस्था केली शेतकरी वर्गाला न्याय साहेबानी मिळवून दिल्याबद्दल स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांचा सोमवारी सत्कार करण्यात आला.
यावेळी सत्तार पटेल यांनी माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांच्या खंबिर नेतृत्वामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. तसेच ग्रामीण भागामध्ये बँकेची शाखा नसेल त्या गावांमध्ये कोणत्याही बँकेची शाखा नाही असे असल्यास फिरती मोबाइल व्हॅन द्वारे शेतकऱ्यांना घरपोच पैसे मिळण्याची व्यवस्था करून दिली त्यामुळे वृद्ध शेतकऱ्यांना बँकेकडे पैशासाठी जाण्याची गरज राहणार नाही बँक आपल्या दारी हा उपक्रम अतिशय स्तुत्य आहे. आणि महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची उपक्रम राबवणारी लातूर जिल्हा बँक ही पहिली बँक आहे. एकीकडे महाराष्ट्रामध्ये जिल्हा बँका दिवाळखोरी कडे जात असताना लातूरच्या जिल्हा बँकेमध्ये मात्र अतिशय चांगल्या प्रकारे नियोजन राबवून महाराष्ट्रात लातूर जिल्हा बँक प्रथम क्रमांकाकडे वाटचाल करीत असल्याबद्दल जिल्हा बँकेचे तसेच शेतकऱ्यांना विदर्भ मराठवाडा आणि खानदेश या तीन विभागांमधून जास्तीत जास्त उच्चांकी ऊस दर मिळवून देण्याचा बहुमान सुद्धा मांजरा परिवार राबवत असुन यात कसलीही शंका घेण्याचे कारण नाही याही वेळी महाराष्ट्रामध्ये उच्चांकी दर देण्याची परंपरा मांजरा परिवार निश्चितच राखणार आहे अशी अपेक्षा पटेल यांनी व्यक्त केली.
यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अरुण दादा कुलकर्णी जिल्हा अध्यक्ष यांच्या हस्ते माजी मंत्री सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांचा सत्कार करण्यात आला यावेळी माजी जिल्हाध्यक्ष राजेन्द्र मोरे, युवा आघाडीचे अध्यक्ष नवनाथ शिंदे, अमित कुलकर्णी, दिलीप सराफ, राजीव कसबे, मांजरा कारखान्याचे व्हाईस चेअरमन श्रीशैल्य उटगे, जिल्हा बँकेचे संचालक नाथसिंह देशमुख, मांजरा साखर कारखान्याचे ज्ञानेश्वर भिसे, बँकेच्या संचालीका सौ स्वयंप्रभा पाटील, प्रकाश भालेकर, बशीर पठाण, नेताजी नानकर, नागेश भालेकर, गणेश कदम, अशोक दहिफळे, हिराचंद जैन उपस्तीत होते.