ग्रामसेवक चलमले यांची चौकशी करा

ग्रामसेवक चलमले यांची चौकशी करा

जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ ग्रामपंचायत कार्यालय येथील ग्रामसेवक हणमंत चलमले यांची नोकरी कालावधीतील चौकशी करण्यात यावी अशी मागणी लातूर ग्रामीण विधानसभा शिवसेना क्षेत्रप्रमुख राजकुमार सुरवसे यांनी जिल्हाधिकारी व जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

लातूर तालुक्यातील चिंचोली बल्लाळनाथ ग्रामपंचायत येथे ग्रामसेवक हणमंत चलमले हे एक वर्षापासून कार्यरत आहेत. त्यांच्याकडे 1 महिन्यापूर्वी हरंगुळ (बु.) या ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार देण्यात आलेला आहे. चिंचोली बल्लाळनाथ हे गाव लोकसंख्येने मोठे असून, तरीसुद्धा गटविकास अधिकारी यांनी हरंगुळ ग्रामपंचायतीचा अतिरिक्त पदभार सदर ग्रामसेवक हे त्यांचे नातलग असल्यामुळे देण्यात आलेला आहे. ग्रामसेवक चलमले यांनी त्यांच्या नोकरी कालावधीत लातूर शहरालगतच्या गावातच वीस वर्ष काम केलेले आहे. या दोन वर्षांमध्ये ग्रामसेवक चलमले गंगापूर, चिंचोली (ब) व त्यानंतर पुन्हा हरंगुळ अशी सतत कोणाच्या ना कोणाच्या आशीर्वादाने बदली करण्यात आलेली आहे. ग्रामसेवक चलमले यांची हरंगुळ येथून गंगापूर पुन्हा गंगापूर वरून चिंचोली (ब) व परत पुन्हा अतिरिक्त हरंगुळ अशी बदली एका वर्षांमध्ये करण्याचे नेमके कारण तरी काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे.

ग्रामसेवक चलमले यांची चौकशी करा

लातूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे तालुक्यातील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, पदाधिकारी ग्रामसेवक बदलीसाठी ज्यावेळेस त्यांच्याकडे जातात तेव्हा गटविकास अधिकारी सांगतात की, ठराविक कालावधी नंतरच बदली करता येते अशी उत्तरे देतात मग मग इतर ग्रामसेवकांना वेगळा व नातलग व मर्जीतल्या ग्रामसेवकांना वेगळा नियम असे का त्यामुळेच ग्रामपंचायत चिंचोली बल्लाळनाथ येथील ग्रामसेवक हणमंत चलमले यांच्या नोकरी कालावधीतील कामांची चौकशी करून योग्य ती कारवाई करावी अशी मागणी लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ शिवसेना क्षेत्र प्रमुख राजकुमार सुरवसे यांनी लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी पी व लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

About The Author