आमदार अण्णा बनसोडे यांच्यावर गोळीबार
पिंपरी-चिंचवड (केशव नवले) : आज बुधवार दुपारी 1 वा. पिंपरी-चिंचवडचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या चिंचवड येथील कार्यालय जवळ एका संशयितांनी येऊन त्यांच्यावर गोळीबार केला. या घटनेत ते बचावले असून पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार तानाजी पवार या संशयित आरोपीला पकडण्यात आले आहे. पोलीस घटनेचा सविस्तर तपास करीत आहेत.
अण्णा बनसोडे हे सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहे. नगरसेवक असल्यापासून ते रोज सकाळी सर्वसामान्य जनतेला भेटून त्यांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. गोळीबार करणाऱ्या संशयित आरोपीने चार गोळ्या झाडल्या सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झालेली नाही. संशयित आरोपी हा स्थानिक असून, आमदार बनसोडे आणि त्यांचे काही व्यावसायिक संबंध आहेत का? याचा तपास पोलिस करीत आहे. घटना घडल्यानंतर गुन्हा दाखल करण्याचे काम उशिरापर्यंत चालू होते. हा गोळीबार शहरांमध्ये चर्चेचा विषय झाला आहे.