रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून परिचारिकांनी आपले कर्तव्य करावे – डॉ. सुधीर बाबूराव जगताप
उदगीर (प्रतिनिधी) : स्वामी विवेकानंद कॉलेज ऑफ नर्सिंग हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर उदगीर यांच्या संयुक्त विद्यमाने आज जागतिक परिचारिका दिन चन्द्राई हॉस्पिटल उदगीर येथे साजरा करण्यात आला. जागतिक परिचारिका दिनानिमित्त पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये चन्द्राई हॉस्पिटल व रिसर्च सेंटर उदगीर डेडिकेटेड कोविड केअर हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या परिचारिकांचे व प्रशिक्षणार्थी परिचारिकांचे प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन गौरव व कौतुक करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर सुधीर बाबुराव जगताप होते. रुग्ण सेवा हीच ईश्वर सेवा समजून सर्व परिचारिकांनी आपले कर्तव्य पार पाडावे. असे मनोगत त्यांनी आपल्या अध्यक्षीय समारोपमधून व्यक्त केले. व सर्व परिचारिकांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री अशोक लवटे, श्री गोपाळराव देवकते, हिरकणी इंटरनॅशनल स्कूल पालम, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश यादव ,प्राचार्य संजय हट्टे, प्राचार्य गणेश तोलसरवाड, महाविद्यालयाचे प्राचार्य व हॉस्पिटल चे नर्सिंग अधीक्षक ज्योती स्वामी, श्री नागसेन तारे व संस्थाचालक श्री राजकुमार हमबलपुरे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अश्विनी वाघे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी सर्व कर्मचार्यांनी पुढाकार घेतला, प्राचार्य नागसेन तारे यांनी आभार व्यक्त केले.