दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1022

दिवसभरात बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1022

नवीन 601 कोरोनाबाधित रुग्ण

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 71622 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 601 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. उपचारादरम्यान 31 रुग्णांचा मृत्यू झाला आहे असे प्रशासनाने जाहीर केले आहे.

लातूर जिल्ह्यात 1695 आरटीपीसीआर चाचणी साठी नमुने घेण्यात आलेलेआहेत. 303 कोरोनाबाधीत रुग्ण आढळून आले आहेत. 2105 रॅपीड अ‍ॅन्टीजीन टेस्ट करण्यात आल्या. त्यामध्ये 298 जण पॉझिटिव्ह आढळून आले. जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 82824 झाली आहे. उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 9568 आहे. लातूर जिल्ह्यात आजपर्यंत 1634 रुग्णांचा मृत्यू झाला असून उपचार घेऊन बरे झालेल्या रुग्णांची संख्या 71622 आहे. आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या 1022 आहे.

About The Author