बिरवली येथे सोयाबीन उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिक
औसा (प्रशांत नेटके) : औसा तालुक्यातील बिरवली येथे सोयाबीन ची घरगुती पद्धतीने उगवण क्षमता तपासणी प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बिरवली चे कृषी सहाय्यक श्री. शहापुरे व्ही एच यांनी शेतकऱ्यांना बियाणे उगवण क्षमता तपासणी चाचणी करूनच पेरणी करण्याचे आवाहन केले , उगवणक्षमता तसेच तपासणीची गोणपाट पद्धत शेतकऱ्यांना प्रत्यक्षात करून दाखविली. शेतकऱ्यांना उत्पादन खर्च कमी कसा करता येईल याबाबत सविस्तर माहिती दिली. मूलस्थानी जलसंधारण अंतर्गत पिकाच्या मुळाशी पाणी , मुरावे त्यासाठी जमिनीवर पेरणी अगोदर उभ्या-आडव्या बळीराम नांगराच्या सरी मारून जमिनीमध्ये पाणी , जिरविणे व ते पाऊस कमी असताना , जुलै-ऑगस्ट मध्ये पिकांना खंड पडल्यानंतर कशा पद्धतीने उपलब्ध होईल व उत्पादनात कशी वाढ होईल याबाबतचे मार्गदर्शन कृषी सहाय्यक श्री. एम. जी. वाघमारे, यांनी दिली .मानव जसे आपले आरोग्य सांभाळण्यासाठी विविध तपासण्या करून रोगाचे निदान करतो त्याचप्रमाणे जमीनीमध्ये कोणती अन्नद्रव्य आहेत व कोणती कमी आहेत,हे जाणून घेतले पाहिजे तसेच आपण खत नियोजन माती परीक्षणानुसारच केले पाहिजे, त्यासाठी माती तपासणी करत असताना माती नमुना कसा काढावा याची माहिती सविस्तर माहिती कृषी सहाय्यक श्री. कंदले ए. पी. यांनी दिली. हा कार्यक्रम सोशल डिस्टंसिंग ठेवून आयोजित करण्यात आला होता. तसेच या कार्यक्रमाची व्हिडिओ द्वारे तयार केलेली चित्रफीत इतर शेतकऱ्यांच्या ग्रुप वर पाठवली जाणार आहे असे , कृषी श्री. सहाय्यक शहापुरे यांनी सांगितले.यावेळी गावातील देवानंद गरड, बजरंग कदम ,परमेश्वर गरड, विकास कदम, सोहेल तांबोळी, शेषराव कदम, किशोर कदम व चंद्रकांत गरड ऊस उत्पादक शेतकरी जगन्नाथ पाटील व इतर शेतकरी उपस्थित होते.