यशवंत विद्यालयात राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी समारोह उत्साहात साजरा

यशवंत विद्यालयात राजश्री शाहू महाराज पुण्यतिथी समारोह उत्साहात साजरा

अहमदपूर( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात कोल्हापूरच्या राजघराण्यातील अग्रणी राजा राजश्री शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी समारोह विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला.
प्रारंभी राजश्री शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य व्ही व्ही गंपले यांच्या हस्ते करण्यात आले.
या समयी सहशिक्षक राम तत्तापुरे यांनी राजश्री शाहू महाराज यांच्या जीवन चरित्रावर विस्तारित प्रकाश टाकून विद्यार्थ्यांनी शाहू महाराज यांचा आदर्श समोर ठेवून आपले जीवन घडवावे असे जाहीर आवाहन केले.
या समयी व्यासपीठावर उपमुख्याध्यापक उमाकांत नरडेले, पर्यवेक्षक दिलीप गुळवे, गजानन शिंदे, अधिक्षक सोमनाथ स्वामी, अशोक पैद्येवाढ, अरुण मोरे, यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
पुण्यतिथीचे अवचित्य
साधून शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्यं साठी निबंध, भाषण स्पर्धा होऊन विजेत्यांना व पाचवी ते नववीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचे व शिष्यवृत्ती परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा बक्षीस देऊन प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कपिल बिराजदार यांनी तर आभार विजय चव्हाण यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

About The Author

error: Content is protected !!