शिक्षण व्यवस्थेत सामाजिक सलोखा राखाण्याचे कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. गणेश हाके पाटील
संत ज्ञानेश्वर विद्यालयात राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी उत्सव साजरा…
अहमदपूर ( गोविंद काळे ) राजश्री शाहू महाराज हे सामाजिक समतेचे प्रणेते असून मोठ्या मनाचे राजे होते. शिक्षण व्यवस्थेत सामाजिक सलोखा राखण्याचे कार्य करून उपेक्षित दीन दलित समाजापर्यंत शिक्षणाची गंगा पोहचविण्याचे कार्य शाहू महाराज यांनी केले आहे. असे मत भाजपा प्रदेश प्रवक्ते गणेश दादा हाके पाटील यांनी व्यक्त केले. ते दिनांक 6 मे रोजी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी सोहळ्याच्या समारोप प्रसंगी संत ज्ञानेश्वर विद्यालयात प्रमुख मार्गदर्शन म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक आशा रोडगे तर प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे समन्वयक कुलदीप हाके व शिवालिका हाके उपस्थित होते. प्रारंभी राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पहिली ते नववी वर्गातील विद्यार्थ्यांचे गुणपत्रक वाटप करण्यात आले. विविध स्पर्धा परीक्षेत नेत्र दीपक यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.त्यामध्ये ऑलिम्पियाड, ज्यूनियर आए. ए. एस., एम.टी.एस.ई.,श्रेया आय.ए.एस परीक्षेतील राज्याच्या गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थ्यांचा व त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मीना तोवर यांनी केले. सूत्रसंचालन शारदा तिरुके यांनी केले तर अध्यक्ष समारोप व आभार आशा रोडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले.