बुद्ध जयंतीनिमित्त सृजन संस्थेतर्फे शैक्षणिक साहित्याचे वाटप
अहमदपूर ( गोविंद काळे ) : बुद्ध जयंती सोहळा निमित्त श्रामणेर व अनागारिका मुलांच्या दहादिवशीय धम्मसंस्कार प्रशिक्षण शिबीर,तक्षशिला बुद्ध विहार काळेगाव ता.अहमदपूर येथे पार पडत आहे.यावेळी संबंध जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध यांची 2567 वी जयंती साजरा होत आहे.या औचित्याने संबधित शिबीरातील 75 विद्यार्थ्यांना भिख्खु महावीरो थेरो,भिख्खु सरणंकर थेरो सचिव महादेव खळुरे,अविनाश धडे यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य व बिस्किटचे वाटप करण्यात आले.
‘गौतम बुद्ध’ हे फक्त एक व्यक्तिमत्त्व नाही आहे तर एक अशी ज्योत आहे. जी हजारो वर्षानंतर ही मानवी जीवनाचा सत्यमार्ग प्रकाशित करत आहे. आणि येणारा अनंत काल हा दिवा सदैव जळत राहील. त्यांचे विचार, त्यांचे उपदेश आज हि दिशादर्शक आहेत.हा विचार आजही संबंध मानवाला गरजेचे आहे.तक्षशिला वुद्ध विहार काळेगाव येथे धम्म संस्कार प्रशिक्षण शिबीरात यअसे विचार रुजविले जातात. या उपक्रमासाठी विजय उरमुंगे एवोलेन्ट हेल्थ,पुणे,श्रीमती पद्मा कळसकर,मल्लिकार्जून खळुरे,अविनाश धडे आदिचे सहकार्य लाभले.