किनगाव पोलीसांच्या अवैध दारू विक्रीवर धाडी
परचंडा,उजना येथील देशी- विदेशी दारू जप्त
किनगाव ( गोविंद काळे ) : येथील पोलीसांच्या धाडीत परचंडा, उजना येथील अवैधरित्या चोरटी दारू विक्री व्यवसाय करणाऱ्यावर कार्यवाही करत त्यांच्या कडील देशी- विदेशी दारू जप्त केली आहे.
सविस्तर माहीती आशी की, दि.०९.०५.२०२१ रोजी १८.३० वाजता फिर्यादी- गजानन अन्सापुरे धंदा- नौकरी यांच्या फिर्यादी वरून आरोपी- विरभ्द्र काशीनाथ शेरे रा परचंडा या पाटीजवळ किनगाव ते अहमदपूर जाणारे रोडवर पत्र्याच्या टपरित विदेशी दारू मॅकडॉल नं १. कंपनीच्या १८० एमएलच्या कंपनीलेबल असलेल्या काचेच्या १५ बाटल्या प्रत्येकी १८०रू प्रमाणे २७०० रू व विदेशी दारू इपेरिअल ब्लु कंपनीच्या १८० एमएलच्या कंपनी लेबल असलेल्या काचेच्या ९ बाटल्या प्रत्येकी १८० रू प्रमाणे १६२० रु असा एकून ४३२०रू प्रो.गुन्हयाचा माल जप्त करण्यात आला आहे आरोपी यांने किनगाव ते अहमदपूर जाणाऱ्या रोड लगत पत्र्याच्या टपरीत सध्या कोविड-१९ चा प्रदुर्भाव टाळण्यासाठी जिल्हाधिकारी, लातूर यांच्या आदेशाचे उलंघन करुन् वरील प्रो. गुन्हयाचा माल विनापास परवाना बेकायदेशीर रित्या चोरटी विक्री व्यवसाय करण्याच्या उदेशाने बळगला व पोलीसाची चाहुल लागताच पळून गेला वैगरे फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला असून उजना येथीलही कारखाना रोडवरील दि.०६.०४.२०२१ धाडीत फिर्यादी- रामचंद्र गोखरे धंदा- नौकरी यांच्या फिर्यादीवरुन देशी दारू भिंगरी चोरटी दारू विक्री व्यवसाय करतांना पत्र्याच्या डब्यात आढळून आल्याने आरोपी- गोरखनाथ पांडूरंग चव्हान रा. सांगवी तांडा ता. अहमदपूर याच्याकडून देशी दारू भिंगरी संत्रा १८० एमएलच्या १६ बाटल्या किमत ८० रु प्रमाणे १२८०रू माल जप्त करण्यात आला व त्याच ठिकाणच्या धाडीत फिर्यादी- मुरलीधर मुरकुटे धंदा- नौकरी यांच्या फिर्यादी वरून दि.०६.०५.२०२१ रोजी १७.०० वाजता आरोपी – लक्ष्मण नामदेव मासळे रा. उजना ता. अहमदपूर यांनेही साखर कारखाना रोडवर चहापाण्याच्या हॉटेलमध्ये विनापरवाना देशी दारू भिंगरी संत्रा कंपनी लेबल असलेल्या १८० एमएलच्या शिल बंद १५ बाटल्या प्रत्येकी किमत ८० रू प्रमाणे १२०० रू माल जप्त केला आहे. सपोनि शैलेश बंकवाड हे किनगाव पोलीस स्टेशनला दोन ते आडीच महीने रूजू झाले तेव्हा पासून अवैध धंदेवाल्याचे धाबे दणानले असून त्यांच्या दारू विक्रीच्या धंदयावर अंदाजित १८ ठीकाणी धाडी टाकून या धंदयावर आळा आणला आहे.