कोरोना संसर्गजन्य रोगाच्या पार्श्वभुमीवर मोफत धान्य वाटप
किनगाव ( गोविंद काळे ) : करोना महामारीच्या अपत्ती काळात केंद्र शासन व महाराष्ट्र शासना कडून मोफत धान्य स्वस्त धान्य दुकानदाराकडे आले असून त्याचे वाटप करण्यात येत आहे.
सध्या देशात व राज्यात कोविड-१९चा प्रर्दुभाव वाढला असून शासन स्थरावर करोना महामारीच्या काळात जनतेला मुलभुत गरजा भागवता याव्या याकरीता उपाययोजना म्हणून राज्य शासनाकडून माहे – मे २०२१ चे नियमीत असलेले धान्य लाभार्थी यांना मोफत वाटप करण्याबाबतच्या सुचना देण्यात आल्या आहेत व केंद्र शासना मार्फत लाभार्थीयांना PMGKAY योजने अर्तंगत ” प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजना” मे-२०२१ व जुन-२०२१ या दोन महीन्यासाठी नियमित धान्य सोबत अतिरिक्त धान्य मोफत वाटप करण्याच्या सुचना देण्यात आल्याने त्या नुसार स्वस्त धान्य दुकानदार चेअरमन बालाजी कांबळे व इतर दुकानदार त्यांच्या दुकानातुन धान्य वाटप करीत आहेत. हे धान्य वाटप करण्याच्या सुचना ज्ञानोबा मोरे नायब तहसिलदार पुरवठा विभाग, अहमदपूर यांनी दिल्या नुसार वाटप करण्यात येत आहे.