शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पॅकेज जाहीर करा – गणेश हाके
अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाआघाडी सरकारने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे आज महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून कोरोना काळात महाराष्ट्रातील शेतकरी रोज आत्महत्या करीत आहेत. कोरोना च्या नावाखाली महाआघाडी सरकारने शेतकऱ्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष केले असून गेल्या वर्षभरात आघाडी सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे शेतकरी मोडून पडला आहे.
आज शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही, उत्पादित केलेला कृषिमाल विकण्यासाठी बाजारपेठा नाहीत. कृषी उत्पन्न बाजार समित्या ओस पडल्या आहेत. आठवडी बाजार बंद आहेत. रस्त्यावर विकायला परवानगी नाही. बाहेरचे व्यापारी शेतमाल खरेदी करू शकत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना उत्पादित केलेली फळे भाजीपाला सडून जात आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. उन्हाळी पिकावर खरिपाची खरेदी अवलंबून असते आज शेतकरी शेतमाल विकू शकत नाही, कोरोना काळात शेतकरी व शेतमजूरासाठी कोणतेही पॅकेज जाहीर केलेले नाही. भीम थाटात केलेल्या कर्जमाफी पासून अर्ध्यापेक्षा अधिक शेतकरी वंचित आहेत. अतिवृष्टी व गार पीठीचे अनुदान अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेले नाही, रोजगार हमीचे कामे सुरू नाही त्यामुळे शेतमजुरांच्या हाताला काम नाही, शेतमजुरांचे उपाशीपोटी हाल होत आहेत. मोफत धान्य वाटपाची घोषणा केली तीही हवेत विरली आहे. अद्याप काही धान्य वाटपास सुरुवात नाही. नुसत्या घोषणा करून सरकार दिवस काढत आहे. मुख्यमंत्री शेतकऱ्यांबद्दल कळवळा असल्याचे बोलतात परंतु शेतकऱ्यांना मदत करताना मात्र हात आखडता घेतात असे चित्र आहे .
आघाडी सरकारने केवळ शेतकरी हिताच्या वल्गना केल्या मात्र आघाडी सरकारच्या काळात शेतकरी हिताची एक ही नवीन योजना सुरू केली नाही. शेतकऱ्यांसाठी कोणतेही नवे धोरण आखले नाही. उलट संकटकाळात शेतकर्यांना मदत करण्यापेषा विधानसभेत ३३ टक्के वीजबिल माफ करू आसे सांगून माफी दिली नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच वीज कनेक्शन तोडले जिजीईकर वासुल करावा तसे शेतकऱ्याकडून वीज बिल वसूल केला. फक्त बोलाचाच भात आणि बोलाचीच कढी शेतकऱ्यांना खाऊ घालण्याचे काम आघाडी सरकारने चालविले आश्या या शेतकरी व शेतमजूर विरोधी आघाडी सरकारचा भाजपा निषेध करीत असून कोरोना काळात इतरांप्रमाणेच शेतकरी व शेतमजुरांनासाठी, बारा बलुतेदारांसाठी स्वतंत्र पॅकेज घोषित करावे, शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी, यासाठी त्यांना आपला माल कोरोना चे नियम पाळून रस्त्यावर विकण्याची तसेच बाजार समित्यांमध्ये विकण्याची परवानगी द्यावी. तसेच फळ व भाजीपाला यासारख्या नाशवंत शेतमालाची विक्री व वाहतुकीसाठी शेतकर्यांना परवानगी द्यावी. अशी भाजपाच्यावतीने शासनास विनंती करण्यात येत आहे.