दिव्यांगाच्या खात्यावर 13 लाख रूपये जमा..!

दिव्यांगाच्या खात्यावर 13 लाख रूपये जमा..!

सम्राट मित्रमंडळाच्या मागणीला यश..!!

अहमदपूर ( गोविंद काळे ) :
लातूर जिल्ह्यातील नागरी क्षेत्रातील नगरपालिका तसेच नगरपंचायत क्षेत्रातील दिव्यांगाच्या खात्यावर प्रशासनाने तेरा लक्ष रूपयांचे अनुदान जमा करण्यात आले आहे.

शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक नगरपालिका तसेच नगरपंचायत स्तरावर दिव्यांगाचा सर्वे करण्यात आला असून अपंगाच्या टक्केवारी नुसार दिव्यांग कल्याण निधी
संबंधितांच्या खात्यावर अनुदान स्वरूपात जमा करण्याचे निर्देश आहेत.दरम्यान औसा नगर परिषद वगळता इतर ठिकाणी हा निधी वाटपास दिरंगाई होत असल्याचे निदर्शनास येताच येथील सम्राट मित्रमंडळाच्या वतीने युवक नेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी यांना निवेदन देवून अनुदान तातडीने जमा करण्याचे निर्देश द्यावे अन्यथा या प्रकरणी दिव्यांगाना सोबत घेवून नाविलाजाने अंदोलन करावे लागेल अशी मागणी केली होती.त्या नुसार दिनांक 27 एप्रील रोजी जिल्हाप्रशासन अधिकारी यांनी जिल्ह्यातील सर्वच नगरपरिषद नगरपंचायत तथा महानगरपालिका यांना पत्र देवून दिव्यांगाचा निधी तातडीने खात्यावर जमा करण्याचे आदेश दिले होते.

त्या नुसार नूकतेच विविध नगर पालिका व नगरपंचायतीचे पत्र प्राप्त झाले असून अनुक्रमे नगरपरिषद उदगीर-तीन लाख त्रेपन्न हजार रूपये,नगर परिषद अहमदपूर-एकोनचाळीस हजार रूपये,नगरपंचायत शिरूअनंतपाळ-तीन लाख तेहत्तीस हजार रूपये,नगर पंचायत चाकूर-दोन लाख चोर्याहत्तर हजार रूपये,नगर पंचायत देवणी-एकोनसत्तर हजार आठशे रूपये,नगर पंचायत रेणापूर-एक लाख सत्तर हजार रूपये,नगर पंचायत जळकोट-एक लाख पच्यान्नव हजार रूपये असे एकूण तेरा लाख रूपयांचे वाटप दिव्यांगाच्या खात्यावर जमा केला आहे.तसेच लातूर महापालिकेने सूध्दा एकूण 469 लाभार्थ्यांना 70 लाख रूपये एवढी मदत केली आहे.

नागरी क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या एकूण महसूली उत्पन्नापैकी चार टक्के इतका निधी अपंगावर(दिव्यांगावर)खर्च करणे शासनाने बंधनकारक केलेले आहे.मात्र अपंग (दिव्यांगा)चा निधी संबंधितांच्या खात्यावर जमा करण्यासाठी अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याच्या दिव्यांग बांधवांच्या तक्रारी प्राप्त होत होत्या.सध्या लाॅकडावून असल्याने अपंग (दिव्यांग) नागरिक खूप अडचणीत होते.अशा प्रसंगी त्यांना मानवतेच्या भावनेने मदत करणे आद्य आपले कर्तव्य आहे.जिल्हा प्रशासनाच्या मदतीने जिल्ह्यातील निलंगा नगर परिषद वगळता इतर सर्वच नगरपालिका आणी नगरपंचायतींनी आपल्या उत्पन्नाप्रमाणे दिव्यांगाच्या खात्यावर योग्य वेळी मदत केली आहे.त्यामुळे या कठीण काळात त्यांना मोठी मदत झाली आहे.त्या बद्दल जिल्हाधिकारी बी.पी.पृथ्वीराज,लातूर महापालिका आयुक्त मित्तल,आयुक्त विक्रांत गोजमगूंडे, जिल्हाप्रशासन अधिकारी सतिश शिवणे,जिल्ह्यातील
सर्व नगर परिषदा व नगरपंचायतीचे अध्यक्ष तसेच मुख्याधिकारी यांचे युवकनेते डाॅ.सिध्दार्थकुमार सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले आहे.

About The Author